Saturday, 21 August 2021

राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या कडून सिने अभिनेत्री दिपाली सय्यद यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक !!

राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या कडून सिने अभिनेत्री दिपाली सय्यद यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक !!


कल्याण, (संजय कांबळे) : महाराष्ट्र राज्यावर कधीही आपत्ती कोसळली तर सदैव त्यांच्या मदतीसाठी सगळ्यात पुढे असणाऱ्या राज्याच्या प्रसिद्ध सिने अभिनेत्री दिपाली भोसले सय्यद व महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्यात तबल ४० मिनिटे विविध सामाजिक विषयांवर चर्चा झाली  यावेळी दिपाली सय्यद यांच्या सामाजिक कार्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी कौतुक केले .


सिने अभिनेत्री दिपाली भोसले सय्यद यांच्या चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून पूरग्रस्त भागाची पाहणी करुन  आपण जी १० कोटी मदत केली त्या बदल आपले खरोखर मनापासून आभार असे उदगार राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी केले तसेच त्या चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून होत असलेल्या सामाजिक कार्याची माहीती घेतली. 


मागील आठवड्यात राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सांगली, कोल्हापूर, सातारा आदी जिल्ह्यात मोठा पुर आल्याने मोठे संकट कोसळले होते. तर कोकणात दरड कोसळून तसेच भूसख्खलन होऊन मोठ्या प्रमाणात जीवीत हानी झाली होती. अनेक संसार उध्दवस्त झाल्याने कोणी कोणाला आधार द्यायचा अशी परिस्थिती निर्माण झाली होती. अशा वेळी मराठ मोळी सिनेअभिनेत्री दिपाली सय्यद भोसले यांनी या पुरग्रस्ताचे अश्रू पुसण्याचे काम केले होते. आपल्या ट्रस्ट तर्फे तब्बल १० कोटी रुपयांची मदतही जाहीर केली होती. तर कोकणातील पुरग्रस्तांंना जीवनावश्यक वस्तू चे वाटप केले होते. त्यांच्या या सामाजिक कार्यामुळे त्या सर्व दूर पोहचल्या होत्या. त्यांच्या वर संपूर्ण राज्यातून अभिनंदनाचा व कौतुकाचा वर्षाव होत होता. या बद्दल देखील राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी कौतुक केले आणि सिने अभिनेत्री दिपाली भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून सांगली येथील  एक हजार मुलींच्या लग्नाची जबाबदारी दिपाली सय्यद यांनी घेतली असून प्रत्येक मुलीच्या नावे पन्नास हजार रुपये ची मुदत ठेव करण्यात आली असून याचे वाटप दि ९|९|२०२१ रोजी सांगली येथे होणार असून या कार्यक्रमास राज्यपाल भगतसिंग कोशारी उपस्थित राहणार आहेत. असेही त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

१२ जानेवारी रोजी कुणबी समाजोन्नती संघ चिपळूण शाखेच्या वतीने युवकांना शेतीविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन !

१२ जानेवारी रोजी कुणबी समाजोन्नती संघ चिपळूण शाखेच्या वतीने युवकांना शेतीविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन ! प्रतिनिधी  - निलेश को...