स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्ष दिनी किन्नर साथींनी दिला नशामुक्त भारत संकल्पाचा नारा !
मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) :
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षी म्हणजेच ७५ वर्षपुर्ती निमित्ताने स्वातंत्र्याच्या पुर्वसंध्येला शनिवार, १४ आँगस्ट २०२१ रोजी दुपारी बेस्ट डेपो सिएसएमटी, मुंबई येथे केंद्र शासनाचे नशामुक्त भारत अभियानाच्या अंतर्गत नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य व किन्नर माँ या सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने नशामुक्त भारत संकल्प कार्यक्रम पार पडला. पोस्टर्स, किन्नर साथी समाजातील विविध भुमिका साकारणा-या व्यक्तींची वेशभुषेव्दारे रेखाटलेल्या व्यक्तीरेखा या उपस्थित सर्वांचे लक्ष वेधुन घेऊन प्रचार पत्रके घेऊन व्यसनमुक्तीच्या कार्यात आपला पाठिंबा असल्याचे दर्शवित होते.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने व्यसनांपासुन ही देशाला आजादी मिळुन निरोगी व व्यसनमुक्त भारत - सक्षम भारत निर्मितीसाठी नशामुक्त अभियानाचा नारा देण्यासाठी समाजातील विविध भुमिका साकारणा-या व्यक्तींची हुबेहूब वेशभुषेव्दारे व्यक्तीरेखा किन्नर साथींनी परिधान करुन देशसेवेत आम्ही ही देशाचे सजग नागरिक म्हणुन तत्पर राहण्याचा आदर्शवादी पायंडा घातल्याचे दर्शविले. यावेळी विविधांगी वेशभुषेच्या माध्यमातून समाजात कार्यरत असणाऱ्या घटकांचा सन्मान म्हणुन त्यांच्या वेशभुषेतुन उपस्थितांना व्यसनांच्या विळख्यात न अडकता निर्व्यसनी राहुन निरोगी व आनंदी जिवन जगण्याचा संदेश वेशभुषेच्या माध्यमातून देण्यात आला. २१ व्या विज्ञानाच्या युगांत ही किन्नर समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट न करत त्यांची अवहेलना केली जाते ही सत्य परिस्थिती असतानाही किन्नर माँ सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आम्ही गरजवंतांना धान्य वाटप, व्यसनमुक्ती, टी. बी., एच आय व्ही, एड्स, किन्नर साथींकरिता शेल्टर होम व त्यांचे पुर्नवसन, किन्नर यांची जनगणना करण्यासाठी शासनाला सर्वतोपरी सहकार्य करणे अशा समाजपयोगी उपक्रमांचे प्रबोधन करण्यासाठी सातत्याने कार्यरत असुन आम्ही स्वतःला देशाचे सजग नागरिक समजुन देशसेवा करणे आपले कर्तव्य समजतो म्हणुनच आम्ही व्यसनमुक्ती सारख्या या सामाजिक उपक्रमाला पाठिंबा देऊन सक्रीयरित्या कार्यरत आहोत आणि सदैव कार्यरत राहण्याचा विश्वास किन्नर माँ सामाजिक संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सलमा खान यांनी दिला.
व्यसनमुक्त युवा पिढी हीच राष्ट्रीय संपत्ती आहे असे असताना मात्र व्यसनांत अडकत चाललेली युवा पिढी व्यसनांपासुन दुर करुन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष करुन युवा पिढीने व्यसनमुक्तीचा ध्यास घेऊन स्वतः सह, परिवार, परिसर, गाव, तालुका, जिल्हा, राज्य, देश अशा सर्व पातळीवर प्रचार, प्रसार, प्रबोधनाच्या माध्यमातुन सक्रीयरित्या कार्यरत राहुन व्यसनमुक्तीच्या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन नशाबंदी मंडाळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास यांनी केले. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी किन्नर माँ सामाजिक संस्थेच्या संस्थापक - अध्यक्ष सलमा खान यांनी व्यसनमुक्तीची शपथ देऊन आजीवन व्यसनमुक्त राहण्याचा संकल्प उपस्थितांना दिला यामध्ये शेकडो मुंबईकरांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.
No comments:
Post a Comment