फळेगाव-आबांर्जे रस्ता खड्ड्यात, इतर रस्त्यांची चाळण, सर्वत्र घाणीचे साम्राज्य?
कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण आणि शहापूर तालुक्यांंना जोडणारा फळेगाव आबांर्जे रस्ता अक्षरशः खड्ड्यात गेला आहे तर इतर गावातील अंतर्गत तसेच बाह्य रस्त्याची चाळण झाली आहे. यामुळे चिखल, कचरा, सांडपाणी, आदीमुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून यामुळेच विविध साथीचे आजार वाढले आहे.
कल्याण आणि शहापूर तालुक्यातील फळेगाव हे मोठ्या लोकसंख्येचे गाव दोन्ही तालुक्याच्या वेशीवर आहे, येथून शहापूर, आबांर्जे, चिखले मार्गे मुरबाड येथेही जाण्या येण्यासाठी रस्ता आहे. या गावाच्या अगदी शेजारीच मढ येथे गंगा गोरेश्वर हे नदीच्या काठावर पवित्र क्षेत्र आहे,येथे महाशिवरात्री ला मोठी यात्राही भरते,अशा या महत्त्वाच्या ठिकाणी रस्त्याची मात्र पुरती बोंबाबोंब आहे, अगदी फळेगाव पासून ते आबांर्जे गावाच्या नाल्या पर्यत रस्ता खड्ड्यात आहे की रस्त्यावर खड्डे हेच कळत नाही.
तर इतर काही गावात सिंमेट काँक्रीट चे रस्ते केले आहेत. पण त्यांना गटारे नसल्याने, असे मजबूत रस्ते काही लोकांनी विविध कारणासाठी फोडल्याने, अडविल्याने, येथे रस्त्यावर चिखल,सांडपाणी, गुंराचे मलमूत्र, कचरा यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे या रस्त्याचा नेमका उद्देश काय? हेच कळल्याचे दिसत नाही, अगदी ही परिस्थिती प्रत्येक गावात दिसते.
मोहना, मानिवली, आंबिवली, मांडा, वासुर्दी, निंबवली, राया, खडवली, फळेगाव, गेरसे, कोसले, संतेचापाडा, घोटसई, रूंदे फळेगाव तसेच अगदी कल्याण मुरबाड वरील म्हारळ, वरप, कांबा येथे रस्त्यांंची काय अवस्था झाली आहे. याला जबाबदार कोण? केवळ प्रशासनाकडे बोट दाखवून चालेल?आपले लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, मंत्री काय करतात? याहूनही महत्त्वाचे आपण नागरिक म्हणून आपली काय जबाबदारी याचा ही विचार व्हायला नको का?
नुकतेच जिल्ह्यातील केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील यांनी जन आशीर्वाद यात्रेचे आयोजन केले होते, त्यामुळे त्यांना येथील प्रश्न, अडचणी, समस्या कळल्या असतील किंवा त्यांच्या कार्यकर्ते मंडळीनी सांगितले असतील अशी अपेक्षा धरून गावोगावचे विविध प्रश्न सुटतील अशी आशा व्यक्त करुन ग्रामस्थांनी देखील पक्षीय राजकारण बाजूला ठेवून, गावविकासा साठी, समाजविकासाठी सदर प्रश्नांचा पाठपुरावा करायला हवा, तेंव्हा गाव समृद्ध व सुजलाम सूफलाम होईल. हे लक्षात घ्यायला हवे.
No comments:
Post a Comment