स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कल्याण तालुक्यात उत्सवात साजरा !!
कल्याण, (संजय कांबळे) : उत्सव तीन रंगाचा, आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी माझा भारत देश घडविला, असे अभिमानाने म्हणत कल्याण तालुक्यात स्वातंत्र्याचा ७५वा अमृतमहोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
आज आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ७५ वर्षे होत आहेत, त्यामुळे या वर्षी चा स्वातंत्र्य दिन हा देशभर अमृत महोत्सव म्हणून साजरे होत आहे. कल्याण प्रांताधिकारी कार्यालयात "उपविभागीय अधिकारी अभिजात भांडे पाटील" यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी पुण्याचे 'माजी आयुक्त दिपक म्हैसकर' उपस्थित होते. तर कल्याण तहसील कार्यालयात "तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी दिपक आकडे" यांनी ध्वजास मांनवंदना दिली आणि डोंबिवली येथील स्वातंत्र्य सैनिक श्री कृष्ण ओक यांच्या घरी जाऊन प्रांताधिकारी अभिजात भांडे पाटील यांनी त्यांच्या हस्ते त्यांना मानपत्र देऊन सन्मानित केले यावेळी तहसीलदार दिपक आकडे उपस्थित होते.
कल्याण पंचायत समिती मध्ये सभापती अनिता वाघचौरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. याप्रसंगी माझी सभापती रंजना केतन देशमुख, माझी उपसभापती पांडुरंग म्हात्रे, गटविकास अधिकारी श्रीमती श्वेता पालवे व कर्मचारी उपस्थित होते.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता प्रशांतकुमार तुकाराम मानकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले यावेळी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कल्याण तालुक्यातील सर्वात मोठ्या म्हारळ ग्रामपंचायती मध्ये देखील स्वतंत्र्याचा ७५वा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संपूर्ण ग्रामपंचायत कार्यालय हे देशाचे प्रतिक, असलेल्या तिंरगा रंगाच्या फुलांच्या माळा नी सजविण्यात आले होते. त्यामुळे एक वेगळी देशभक्ती ची भावना परिसरात निर्माण झाली होती. येथील सरपंच प्रगती प्रकाश कोंगिरे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले तर यावेळी उपसरपंच अश्विनी निलेश देशमुख, ग्रामविकास अधिकारी श्री वाकचौरे आणि सर्व कर्मचारी उपस्थित होते .म्हारळ ग्रामपंचायत कार्यालय हे तिंरगी फुलांनी सजवल्याने तालुक्यात आकर्षणाचे केंद्र बनले होते.
असाच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साह वरप, कांबा, रायते, घोटसई, आपटी, मांजर्ली, मामणोली, गोवेली, केळणी, कोलम, चौरे, उशीद, काकडपाडा, गेरसे कोसले, पळसोली, वासुर्दी, निंबवली, गुरवली, खडवली, आदी ग्रामपंचायत मध्ये दिसून आला.
No comments:
Post a Comment