Sunday, 15 August 2021

कोल्हापूर पूरग्रस्तांच्या सेवेत कल्याणची मनसे महिला व विद्यार्थी सेना अवतरली !!

कोल्हापूर पूरग्रस्तांच्या सेवेत कल्याणची मनसे महिला व विद्यार्थी सेना अवतरली !!


कल्याण, प्रतिनिधी - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आदरणीय "राजसाहेब ठाकरे" यांच्या आदेशानुसार व सरचिटणीस "शालिनीताई ठाकरे" यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण येथील महिला सेना कोल्हापूरमधील अनेक गावं, वस्त्या मदतीपासून वंचित राहिलेल्या आहेत त्यांची सेवा करण्यासाठी दाखल झालेली आहे. जिथे कमी, तिथे आम्ही हे ब्रीदवाक्य घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या "जिल्हाध्यक्षा सौ.स्वाती कदम" यांनी कोल्हापूर येथील "इचलकरंजी जिल्हा अध्यक्षा सौ.सिंधुताई शिंदे" यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील अनेक गावांना भेटी देऊन पूरस्थितीमुळे उध्वस्त झालेल्या शेकडो लोकांच्या संसाराला हातभार लावण्यासाठी पुढाकार घेतला. या महासंकटाची सर्वाधिक झळ अनेक गरीब कुटुंबांना बसली आहे. अनेकांचे संसार चिखलमय झाले आहेत. स्वतःची पदरमोड करून या सर्व महिलांनी पूरग्रस्त कुटुंबातील महिलांसाठी शेकडो किट तयार केले. या किटमध्ये डाळ, तांदूळ, गहू, पीठ, साखर, चहापत्ती, दुधाची पावडर, हळद, मसाला, साबण, टूथपेस्ट, मेणबत्ती, माचीस, पाणी बॉटल, मॅगी, सोयाबीन पॅकेट, सॅनिटरी नॅपकिन, बिस्किटे, महिला, पुरुष व लहान मुलांसाठी कपडे, चटई, सोलापुरी चादर, नॅपकिन, शालेय उपयोगी साहित्य आदींचा समावेश आहे. 

या आदर्शवत कार्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या "जिल्हाध्यक्षा स्वाती कदम, उपशहर अध्यक्षा गीता काट्रप, शाखाध्यक्ष वैभव देसाई" यांची मोलाची साथ लाभली तसेच 'शाखाध्यक्षा सौ. श्वेता म्हात्रे', 'उपविभाग अध्यक्ष अमित गव्हाणे, जयेश जोशी' (वार्ड क्र.३८)

'त्याचप्रमाणे मुरबाड जिल्हाध्यक्षा सौ.नयना भोईर यांनी देखील पूरग्रस्तांना किटचे वाटप केले"

'महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे कल्याण पूर्व शहर अध्यक्ष निर्मल निगडे यांनी खूप परिश्रम घेऊन उपक्रमाला हातभार लावला'

कल्याण पुर्व शहर सचिव यतीन जावळे, मनविसे उपशहर अध्यक्ष अंकुश राजपूत, शाखाध्यक्ष सचिन पवार, विजय जाधव, रितेश पाटील,शैलेश नेहरकर व विभाग अध्यक्ष विपुल पानसरे यांनी देखील उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी परिसरातील शिरटी, हसुर, कुरुंदवाड, तारदाळ, ताकवडे व शिरढोन या गावातील पूरग्रस्तांना गृहउपयोगी वस्तूंच्या कीटचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्षा "सौ.स्वाती कदम, सौ.नयना भोईर, उपशहर अध्यक्षा गीता काट्रप, नगरसेविका तृप्ती भोईर, सुनंदाताई कोट, शिरटी गावच्या पहिल्या महिला सरपंच अनिता चौगुले, माजी सरपंच राहुल सूर्यवंशी, हसुर गावचे कार्यकर्ते सूरज आयनापूरे, विद्यार्थी सेनेचे सुयश धनावडे, शाखाध्यक्ष वैभव देसाई, विभाग अध्यक्षा विजयाताई शिंदे, उपविभाग अध्यक्षा कोमल राय, चित्रा गंद्रे, गीता केणे" व इतर पदाधिकारी तसेच असंख्य गावकरी उपस्थित होते.

*शिरटी व हसुर गावचे सरपंच यांनी समस्त महिला व विद्यार्थी सेनेच्या सर्व उपस्थित पदाधिकारी यांना आभार व्यक्त करणारे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले*

मनसे माजी नगरसेवक तथा 'कल्याण पूर्व विधानसभा अध्यक्ष अनंता गायकवाड,विभाग अध्यक्षा सौ.भारती डाकवे, कोमल रॉय आदी पदाधिकारी तर राखी खैरे, दिनेश खैरे, विक्रात म्हात्रे, स्वप्नील कदम, ओम काट्रप, अथर्व खैरे, लक्ष्मी प्रजापती, मनाली मराठे' यांनी देखील मदतीचा हातभार लावला.

No comments:

Post a Comment

डॉ.भारती बावदाने व शिवसेना विधानसभाप्रमुख डॉ.सुबोध बावदाने यांच्या वतीने कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांचा सत्कार सोहळा संपन्न ; आशीर्वाद युवा मंडळाच्या शेडचे उद्धाटन !

डॉ.भारती बावदाने व शिवसेना विधानसभाप्रमुख डॉ.सुबोध बावदाने यांच्या वतीने कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांचा सत्कार सोहळा संपन्न ; आशीर्वाद ...