प्रधानमंत्री आवास योजनेत राज्य पुरकृत मध्ये कल्याण तालुका प्रथम, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात सन्मान !!
कल्याण, (संजय कांबळे) : महाआवास अभियान ग्रामीण अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत आवास योजनेत उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्ती व संस्था साठी असलेल्या पुरस्कारा मध्ये कल्याण तालुक्याला राज्य पातळीवरील प्रथम तर जिल्हा पातळीवरील तृतीय क्रमांक पटकावला असून स्वातंत्र्याच्या ७५व्या अमृतमहोत्सवाच्या पुर्वसंध्येला आ. किसन कथोरे यांच्या हस्ते तसेच जिल्ह्याच्या ठिकाणी विविध मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
महाआवास अभियान ग्रामीण अंतर्गत सर्वोत्कृष्ट क्लस्टर घोटसई व मांजर्ली गटाला देण्यात आला. सदर पुरस्कार तालुक्याचे गृहनिर्माण अभिंयता खुशाल छतलानी यांना देण्यात आला. सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत प्रधानमंत्री योजना ग्रामीण मध्ये प्रथम क्रमांक राया ,द्वितीय क्रमांक पळसोली ग्रामपंचायत, तृतीय क्रमांक म्हसकळ यांना जाहीर झाला.
तर राज्य पुरस्कृत योजनेमध्ये पहिला क्रमांक ग्रामपंचायत बेहरे, व्दितीय नंबर काकडपाडा, तृतीय क्रमांक वसत शेलवली या ग्रामपंचायतीला जाहीर झाला. तसेच सर्वोत्कृष्ट घरकुल प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत गणेश शांताराम वाघे (राया) प्रथम क्रमांक व शांताराम मिठ्या वाघे, यांना व्दितीय क्रमांक देण्यात आला. तर राज्य पुरस्कृत योजना सर्वोत्कृष्ट घरकुल पहिला क्रमांक मुकेश हिरामन गायकवाड, ग्रामपंचायत जांभूळ, दुसरा क्रमांक छाया किशोर फसाळे, ग्रामपंचायत आणे भिसोळ, तर तिसरा क्रमांक रविंद्र केशव मुकणे ग्रामपंचायत वसत शेलवली यांना देण्यात आला.
या सर्वांना मुरबाड विधानसभा मतदार संघाचे कार्य सम्राट आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते कल्याण पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात सन्मान चिन्हे व प्रमाणात देऊन गौरविण्यात आले. यावेळी बोलताना आ. कथोरे म्हणाले, घरकुल हा प्रत्येकाच्या जिव्हाळयाचा विषय असतो, लाभार्थ्यांच्या घरापर्यंत जाऊन त्यांना लाभ देण्यात जो आंनद असतो तो खूप महत्त्वाचा आहे व हे काम कल्याण च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले आहे यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे,असे सांगून सन २०१६/१७ पासून कल्याण तालुक्यात घरकुलाच्या बाबतीत अंत्यत चांगले काम सुरू असल्याने त्यांनी सर्वाचे अभिनंदन केले. यानंतर माझी उपसभापती यशवंत दळवी यांचे देखील भाषण झाले. तालुक्यात घरकुलांचे काम चांगले होत असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले तसेच अजूनही काही गरीब आहेत ,त्यांना ही घरकुल मिळावे अशी इच्छा व्यक्त केली. याप्रसंगी कल्याण पंचायत समितीच्या सभापती अनिता वाघचौरे, उपसभापती किरन ठोंबरे, सदस्य यशवंत दळवी, पांडुरंग म्हात्रे, रंजना देशमुख, दर्शना जाधव, रेश्मा भोईर, अस्मिता जाधव,गटविकास अधिकारी श्वेता पालवे, पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, आदी मान्यवर उपस्थित होते.
यानंतर स्वातंत्र्याच्या ७५व्या अमृतमहोत्सवी दिवशी ठाणे जिल्हा परिषदेच्या सभागृहात पालकमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दागंड, पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, जिप अध्यक्षा,पुष्पा पाटील, उपाध्यक्ष, सुभाष पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, ठाणे महानगरपालिकेचे महापौर नरेश म्हस्के, ठाणे शहर पोलीस आयुक्त, आदी मान्यवरांच्या हस्ते कल्याण तालुक्यातील पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायत व सरपंच, गटविकास अधिकारी यांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. हा सन्मान म्हणजे कल्याण च्या शिरपेचात मानाचा तुरा असल्याचे मत यावेळी काकडपाडा ग्रामपंचायतीचे सरपंच प्रवीण चौधरी यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्तार अधिकारी श्रीमती विशाखा परटोले यांनी केले.
No comments:
Post a Comment