मध्यस्थी करायला गेला व जीव गमावून बसला ! "नागपूर येथील खळबळजनक घटना"
अमरावती : नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये भांडण सोडवायला गेलेल्या एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. या घटनेनं नागपूर चांगलंचं हादरलं आहे. दोघांमध्ये सुरु असलेलं भांडण सोडवायला गेलेल्या एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. ज्या दोघांमध्ये भांडण सुरु होतं त्यांच्यातील एकाने हि हत्या केली आहे. मृत तरुणाचं नाव प्रवीण कथाने असं आहे.
मृत प्रवीण हा परसोडी येथील रहिवाशी होता. तर आरोपी आशिष सुरेश हा स्थानिक नागरिक आहे. आशिष हा बांधकाम कामगार आहे. आशिषनं साहिल धमके याच्याकडे आपल्या कामाचे पैसे मागितले असता आशिष आणि साहिल यांच्यात जोरदार भांडण झाले. आशिष आणि साहिल यांच्यात कामाच्या पैशांवरुन वाद झाला होता. या दरम्यान मृत प्रवीण या दोघांमधील वाद सोडवण्यास गेला होता. प्रवीण भांडण सोडवण्यासाठी आल्यानं आशिष याला राग आला. यानंतर रागाच्या भरात आरोपी आशिषनं प्रवीणवर वीट हल्ला केला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला प्रवीणचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी आशिषला अटक केली आहे.
No comments:
Post a Comment