Thursday, 12 August 2021

लोकशाहीर, लोककवी वामनराव कर्डक यांच्या जन्मशताब्दी वर्षास कल्याणमधून सुरवात !

लोकशाहीर, लोककवी वामनराव कर्डक यांच्या जन्मशताब्दी वर्षास कल्याणमधून सुरवात !


कल्याण, प्रतिनिधी : सत्ताधाऱ्यांना आणि प्रस्थापित समाजाला आपल्या लेखणीतून जाब विचारणाऱ्या लोकशाहीर, लोककवी वामनराव कर्डक यांच्या जन्मशताब्दी वर्षास कल्याणमधून सुरवात होत आहे. १४ ऑगस्ट रोजी कल्याणमधील सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन केले जाणार आहे अशी माहिती पु. ल. कट्ट्यातर्फे देण्यात आली. या वेळी कल्याण पश्चिमेचे शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर, ज्येष्ठ कवी प्रा. प्रशांत मोरे, साहित्यिक गिरीष लटके, ज्येष्ठ नाटय़ अभिनेते आणि कवी सुधीर चित्ते आदी मान्यवर उपस्थित होते. १४ ऑगस्ट रोजी होणाऱ्या कार्यक्रमास वामन कर्डक यांच्या गावचे सरपंच दत्ताराम डोमाडे यांच्यासह जे. जे. आर्ट स्कूलचे गणोश तरतरे, कायद्याने वागा चळवळीचे प्रमुख राज असरोंडकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. उद्घाटना निमित्त कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या कविसंमेलनात अरुण म्हात्रे, प्रशांत वैद्य, रमेश आव्हाड, किरण येले, प्रशांत मोरे, संदेश ढगे, वृषाली विनायक आणि आकाश पवार आदी सहभागी होणार आहेत.

पु. ल. कट्टा ही संस्था कल्याणमध्ये दोन दशके साहित्यिक आणि सामाजिक कार्य करीत आहे. पु. ल. देशपांडे आणि वामन कर्डक हे समकालीन होते. कर्डक यांनी त्यांची लेखनी सर्व दूर पसरविली. कर्डक यांच्या जन्मशताब्दी निमित्त वर्षभर कार्यक्रम केले जाणार आहे. त्यात राज्यातील १० जिल्हे सहभागी होणार आहेत. लोकशाहीर, लोककवी वामन कर्डक जन्मशताब्दी महोत्सव समितीच्या अध्यक्ष पदी कवी किरण येले हे काम पाहणार आहे. कार्याध्यक्ष पदी कवी प्रा. प्रशांत मोरे काम पाहणार आहेत. तर स्वागताध्यक्ष पदी कल्याण पश्चिमचे शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर असणार आहेत. 

No comments:

Post a Comment

मनसेच्या १९ व्या वर्धापनदिनी शृंगारतळीत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ; सर्व समाज घेणार सहभाग !!

मनसेच्या १९ व्या वर्धापनदिनी शृंगारतळीत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ; सर्व समाज घेणार सहभाग !! ** मनसेचे प्रमोदजी गांधी यांचा सामाजिक सौख्य ...