धायरीगाव, पुणे येथे भारतीय जनता पक्षाच्या उपाध्यक्ष यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह बहुजन विकास आघाडी पक्षात प्रवेश !
पुणे, प्रतिनिध : बहुजन विकास आघाडीचे कणखर नेतृत्व तसेच महाराष्ट्रात वाढत असलेली लोकप्रियता, पक्षाची सामाजिक बांधीलकी आपल्या मतदारसंघात केलेला विकास, म्हणून आज दि. १२-०८-२०२१ रोजी धायरीगाव पुणे या ठिकाणी बहुजन विकास आघाडी पक्षाचे पुणे ज़िल्हा निरीक्षक तसेच नाशिक ज़िल्हा अध्यक्ष भावसिंग साळूंके यांच्या आदेशानुसार भारतीय जनता पार्टी पुणे ज़िल्हा उपाध्यक्ष मा. जयकिसन ओमप्रकाश गोगलिया (राजूभाई) यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह मा. सनीशेठ रायकर नेते बहुजन विकास आघाडी पुणे ज़िल्हा यांच्या मार्गदर्शना नुसार जाहीर पक्षप्रवेश संपन्न्न झाला.
मा. तुकाराम हरिभाऊ बाळकवडे (हिंजवडी, प्रसिद्ध उद्योजक) यांनी 40 कार्यकर्ते व मा. रमेश दुर्गाप्पा हिरेकरू (घोरपडीगाव , पुणे ) यांनी आपल्या 50 कार्यकर्ते सोबत जाहीर पक्षपवेश केला. त्या वेळी मा. उमेश भाई तेजी, मछिंद्र सुपेकर, प्रकाश कुलकर्णी, हर्षवर्धन गोसावी, कुंदन चव्हाण, उमेशदादा शिंदे, हेमंत मोहिते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे संयोजन धनंजय घोलप यांनी केले.
No comments:
Post a Comment