भिवंडी तहसीलदार अधिक पाटील यांची रेती माफियांवर धडक कारवाई,16 लाखांचे बार्ज व सक्शन पंप केले नष्ट.!
भिवंडी, दिं,14, अरुण पाटील (कोपर) :
भिवंडी तालुक्याच्या खाडी पात्रात मोठ्या प्रमाणावर रेती माफियां कडून अनधिकृतपणे रेती उत्खनन केले जात असल्याच्या तक्रारी वाढल्याने भिवंडी तहसिलदार अधिक पाटील यांनी आपल्या विशेष तलाठी पथकासह खाडी पत्रात विविध ठिकाणी कारवाई करीत सुमारे 16 लाखाची मालमत्ता जप्त केली आहे या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भिवंडी तालुक्यातील खाडीकिनारी मोठ्या प्रमाणात रेतीचे उत्खनन करून पर्यावरणाचा ऱ्हास केले जात असल्याची तक्रार राज्य शासन व ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडे जाताच ठाणे जिल्हाधिकारी डॉ राजेश नार्वेकर यांनी गंभीर दखल घेतली. भिवंडी उपविभागीय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे, ठाणे रेती गटाचे तहसीलदार राहुल सारंग व तहसीलदार अधिक पाटील यांना कारवाई करण्याचे आदेशा दिले.
त्या आदेशाच्या अनुषंगाने तहसीलदार श्री.अधिक पाटील व रेती गटाचे तहसीलदार राहुल सारंग यांनी आपल्या विशेष मंडळ अधिकारी तलाठी पथकासह पहाटे कशेळी काल्हेर ते कोनगाव या खाडी पात्रात बोटीद्वारे गस्त घालून रेती उत्खनन करणारे दोन सक्शन पंप व एक बार्ज अंजुर व कोनगाव क्षेत्रातुन ताब्यात घेतले.धाड पथकाची चाहूल लागताच बार्ज वरील चार व्यक्तींनी पाण्यात उड्या मारून पलायन केले.त्या वेळी बार्ज वरील व्यक्तींनी बार्ज वरील व्हॉल्व उघड केल्याने बार्ज मध्ये पाणी साचल्याने पथकाने बार्ज त्याच ठिकाणी पाण्यात बुडविला आहे.
तर दोन सक्शन पंप काल्हेर येथे आणून ते हायड्रो च्या साह्याने पाण्या बाहेर काढून गॅस कटरच्या सहाय्याने सक्शन पंप निष्कासित करण्यात आले आहेत .सदरच्या कारवाईत तब्बल 16 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करीत बार्ज मालका विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .अधिक तपास नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे करीत आहेत.
No comments:
Post a Comment