Tuesday, 14 September 2021

भिवंडीत खड्डयांचे साम्राज्य , वाहतूक पोलिसांनी बुजवले खड्डे. !

भिवंडीत खड्डयांचे साम्राज्य , वाहतूक पोलिसांनी बुजवले खड्डे. !


भिवंडी, दिं,14, अरुण पाटील (कोपर) :

भिवंडी शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.राजेंद्र मायने यांनी रस्त्यात पडलेल्या खड्डयां संधर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग, रस्ते विकास महामंडळ, एमएमआरडीए तसेच संभंधित विभागांना पत्रव्यवहार करून गणपतीपूर्वी खड्डे बुजवण्याचे लेखी पत्र दिले होते. मात्र त्यावर सर्वच शासकीय यंत्रणांनी दुर्लक्ष केले.या खड्डयांच्या साम्राज्यामुळे वाहतूक संथ गतीने सुरु राहील्याने वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे शहर वाहतूक पोलिसांनी भिवंडीतील विविध मार्गावरील पडलेले खड्डे सोई नुसार बुजवण्याचे काम केले आहे.

पावसाळा सुरू होताच शहरातील विविध भागात खड्डे पडतात. या पडलेल्या खड्डयांवरुण सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांसह प्रतिनिधी रस्त्यावर उतरून राजकारण करताना दिसून येतात.मात्र हे राजकारणी स्वतःच्या खर्चाने कधी खड्डे बुजवताना दिसत नाही तर फक्त भाषणे ठोकताना दिसतात. 

सर्वच शासकीय यंत्रणांकडून प्रतिसाद मिळाला नसल्याने व या खड्ड्यानंमुळे वाहन चालकांन बरोबरच वाहतूक पोलिसांना देखील डोकी दूखी होत असल्याने अखेर वाहतूक पोलिसांनी  मार्गावर पडलेले खड्डे बुजवण्याचे काम केले आहे.विशेष म्हणजे वाहतूक पोलीस अधिकारी श्री. मायने यांनी असेही सांगितले आहे की ' मुंबई नाशिक महामार्ग तसेच ठाणे ते भिवंडी, कशेळी ते अंजुर फाटा व मानकोली ते चिंचोटी - कामन रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.मुख्य म्हणजे नारपोली -अंजूर फाटा, उपवाहतूक शाखेच्या अंतर्गत येणाऱ्या माणकोली नाका चौकी ,अंजूर फाटा,72 गाळा चौकी  काल्हेर पाईप लाईन, सेंट्रल पॉईंट, ब्रॉडवे, राम पाटील चौक (राहनाळ ),मराठा पंजाब - अंजूर फाटा, प्रेरणा कॉम्प्लेक्स, वळपाडा,या वइतर विविध ठिकाणी दहा टायर (मल्टी एक्सल) वाहन चालकांकडून " नो " इंट्रीच्या नावाखाली पावत्या फाडल्या जात असल्याने पावत्या घेण्यासाठी या सर्व ठिकाणी रस्त्याच्या कडेला वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात त्यामुळे देखील  परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होऊन लहान मोठे अपघात व वाहनांचे  नुकसान देखील होत आहे. 

प्रशासनाला वारंवार विनंती करूनही कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने वाहतूक पोलिसांना रस्त्यावर उतरून खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले आहे. पंधरा दिवसापूर्वी मनसैनिकांनी टोल वसुल करणाऱ्या ठेकेदारा विरोधात  खड्ड्यांच्या विषयावरून मालोडी टोलनाका फोडला होता. तसेच पडघा टोल नाका व कशेळी टोल नाका या दोन्ही टोल नाक्यांवर आंदोलन करून रस्ता बनवा अथवा टोलवसुली बंद करण्याचा इशारा दिला आहे.

त्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही रस्त्यांवरील खड्याच्या संबंधित अधिकाऱ्यां सोबत पाहणी दौरा केला होता. शिवाय केंद्रीय "पंचायय राज " राज्य मंत्री खासदार कपिल पाटील यांनी रस्ते दुरुस्त "न" करताच टोल वसुली केल्यास मी स्वतः टोल नका पेटवुन देईन असा सज्जड दमही दिला आहे. मात्र तरीही रस्ते दुरुस्ती केल्याचे काही दिसत नाही. त्यामुळे वाहतूक पोलिसांनीच आता खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे.

No comments:

Post a Comment

टिटवाळा येथे सिद्धिविनायक मंदिरात भाविकांसाठी मोफत अन्नछत्र सुरू‌ !

टिटवाळा येथे सिद्धिविनायक मंदिरात भाविकांसाठी मोफत अन्नछत्र सुरू‌ ! *शिवसेना उपशहर प्रमुख विजय देशेकर यांचा स्तुत्य उपक्रम* टिटव...