Tuesday, 21 September 2021

24 सप्टेंबरला आशा अंगणवाडी सीआरपी कर्मचाऱ्यांचा जळगावला मोर्चा !!

24 सप्टेंबरला आशा अंगणवाडी सीआरपी कर्मचाऱ्यांचा जळगावला मोर्चा !!


चोपडा ..महाराष्ट्र राज्य आयटक व इतर संघटनांतर्फे येत्या 24 सप्टेंबरला राज्यव्यापी एकजुटीच्या संप करण्याचा इशारा सरकारला देण्यात आला आहे
त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचारी आशा व गटप्रवर्तक कर्मचारी व महाराष्ट्र राज्य जीवन उन्नती अभियान कर्मचारी सी आर पी एफ एल सी आर पी या कर्मचाऱ्यांचा जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर दिनांक 24 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता मोर्चा आयोजित करण्यात आ ला आहे अशी माहिती जळगाव जिल्हा आयटकने  प्रसिद्ध केलेल्या पत्रकात देण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर असे की, विविध योजना काम करणाऱ्या या सर्व कर्मचाऱ्यांना किमान एकवीस हजार रुपये पगार. पाच हजार रुपये पेन्शन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना नवीन मोबाईल, आशांना मोबाईल, गत प्रवर्तक यांना लॅपटॉप तसेच आशा कर्मचाऱ्यांचे एप्रिल 21 पासून ची रखडलेली मानधनवाढ आणि कोविड भत्ता मिळावा सी आर पी/ एफ एल सी आर पी या कर्मचाऱ्यांचा या सर्व स्किम कर्मचारी व योजना त कार्यरत कर्मचाऱ्यांना नोकरीत कायम करण्यात यावे आदी मागणीसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला असून या मोर्चात जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी गणवेशात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सेशन कोर्टासमोर जमावे असे आवाहन आयटक चे जिल्हाध्यक्ष अमृत महाजन, प्रेमलता पाटील, मीनाक्षी सोनवणे, मीनाक्षी कातोले, सुमित्रा बोरसे, शारदा पाटील, नंदा वाणी, वत्सला बोरसे, वत्सला पाटील, वंदना पाटील, दिव्यश्री पाटील, प्रतिभा जावळे, कांचन सुरवाडे, हिराबाई महाले, सुनंदा पाटील, चित्रा वारे, अंजना माली, चारुलता पाटील, साधने धांडे, रेखा जमदले, माया रानित, मनीषा इंगळे, विद्या पाटील, लता पाटील, रेखा अहिरे, ज्योती पाटील, सुदर्शन पाटील, आदींनी केले आहे

No comments:

Post a Comment

साई परिवार सेवाभावी ट्रस्ट अध्यक्ष मंगेश अंकुश रासम सन्मानित !

साई परिवार सेवाभावी ट्रस्ट अध्यक्ष मंगेश अंकुश रासम सन्मानित ! मुंबई (शांताराम गुडेकर)                सेनादल अधिकारी तथा सीबीआय ...