Tuesday, 21 September 2021

कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांनी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन !!

कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांनी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन !!


कल्याण, (संजय कांबळे) : ठाणे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या आदिवासी समाजातील शेतकऱ्यांच्या साठी बिरसा मुंडा कृषी क्रांती व नवबौध्द या अनुसूचित जाती समाजातील शेतकऱ्यांकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन कल्याण पंचायत समितीचे सभापती व गटविकास अधिकारी यांनी केले असून शासनाच्या http:mahadbtmahait.gov.in. या वेबसाइटवर आँनलाईन अर्ज करायचे आहे.

गेल्या दिडदोन वर्षांपासून कोरोनाच्या महामारी संकटामुळे शेतकरी मोठा अडचणीत सापडला आहे. भाजीपाला व पिक येवून ही मार्केट नसल्याने मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. परंतु जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने आर्थिक दृष्टीने मागासलेल्या असलेल्या आदीवासी समाजातील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना तसेच नवबौद्ध अनुसूचित जाती समाजातील शेतकऱ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबविण्यात येत आहे. 

अनुसूचित जमाती व अनुसूचित जाती प्रवर्गातील सक्षम प्राधिकरणाने दिलेले जात प्रमाणपत्र, अत्यावश्यक असून लाभार्थ्यांकडे किमान ०:४० हेक्टर जमीन पाहिजे तसेच इतर लाभ घेण्यासाठी ०:२० हेक्टर क्षेत्रासह जमीनधारणाचा ७/१२ व ८अ चा उतारा आणि १ लाख ५० हजारांच्या आत उत्पन्न असणे गरजेचे आहे.

लाभामध्ये नवीन विहीर बांधणे, जुनी विहीर दुरुस्ती, शेतकऱ्यांची प्लास्टिक अस्तारीकरण, वीज जोडणी, आकार, पपसंच, इनवेल, बोअरिंग, सूक्ष्म स्विचसंच, तूषारसंच, ठिंबकसंच, परसबाग, पीठिसी, एचडीएफसी पाईप आदी चा समावेश आहे. या बाबतीत आँनलाईन अर्ज करावे लागणार असून कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांनी या कृषी योजनाचा लाभ घ्यावा असे कल्याण पंचायत समितीच्या सभापती श्रीमती अनिता वाघचौरे आणि गटविकास अधिकारी अशोक भवारी यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

साई परिवार सेवाभावी ट्रस्ट अध्यक्ष मंगेश अंकुश रासम सन्मानित !

साई परिवार सेवाभावी ट्रस्ट अध्यक्ष मंगेश अंकुश रासम सन्मानित ! मुंबई (शांताराम गुडेकर)                सेनादल अधिकारी तथा सीबीआय ...