डोंबिवली पूर्व देसले पाडा येथील तळ + 4 मजली अनधिकृत इमारतीवर निष्कासनाची धडक कारवाई !
कल्याण; १२/९/२१ :
महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देशानुसार आणि विभागीय उपायुक्त सुधाकर जगताप यांचे मार्गदर्शनाखाली भारत पवार- सहाय्यक आयुक्त ई प्रभाग यांनी डोंबिवली पूर्व देसले पाडा येथील मनोज तिवारी व विशाल सिंग यांचे सर्वे नंबर 71 वरील तळ + चार मजल्याचे अनधिकृत बांधकाम निष्कासनाची धडक कारवाई आज केली. सदर कारवाई इ प्रभागातील अनधिकृत बांधकाम नियंत्रण पथक व मानपाडा पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या पोलीस बंदोबस्तात 4 कॉम्प्रेसर ब्रेकर व 2 गॅसकटर च्या साह्याने करण्यात आली.
डोंबिवली पश्चिम येथील ह प्रभागातही ,सम्राट चौक, पंडित दीनदयाळ रोड येथील साई केअर हॉस्पिटल समोर तळ +6 मजली अनधिकृत इमारतीवर निष्कासनाची धडक कारवाई आज करण्यात आली. सुहास गुप्ते-सहाय्यक आयुक्त,ह प्रभाग यांनी ह व ग प्रभागातील अनधिकृत बांधकाम नियंत्रण पथक व विष्णू नगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्या पोलीस बंदोबस्तात चार कॉम्प्रेसर ब्रेकर व दोन गॅस कटरच्या सहाय्याने सदर कारवाई करण्यात आली. त्याच प्रमाणे सदर बांधकाम करणारे व जमीनमालक यांच्याविरुद्ध महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम व महाराष्ट्र नगररचना अधिनियम 1966 नुसार गुन्हा दाखल करण्याची कारवाई देखील करण्यात आली.
No comments:
Post a Comment