Monday, 13 September 2021

मोरगिरी धनगरवाडीचा विकास पुरुष हरपला !!

मोरगिरी धनगरवाडीचा विकास पुरुष हरपला !!


पोलादपूर : मोरगिरी धनगरवाडी हा अतिशय दुर्गम भाग आणि अशा भागामध्ये ज्यांचा पूर्णपणे व्यवसाय गाई, म्हशी सांभाळणे आशा  परिस्थिती मध्ये बाळाराम विठ्ठल झोरे हे गेली 40 वर्षे पोलादपूर तालुक्यामध्ये समाजकारण राजकारणामध्ये ते सक्रिय होते मोरगिरी धनगरवाडी साठी त्यांनी पहिली शाळा बांधण्याचं ठरवलं त्यावेळी मोजकिच घरे आणि पट सुद्धा कमी अशा परिस्थितीमध्ये खूप लढा देऊन साधी कौलारू शाळा उभी केली आजही ती शाळा तशीच आहे प्रामुख्याने दगड आणि कौले तद्नंतर त्यांनी जाण्यायेण्यासाठी जंगलातून पायी वाट यांचे रूपांतर रस्त्यामध्ये करण्याचे ठरवले 1995 च्या सुमारास स्व. प्रभाकरजी मोरे माजी मंत्री यांचे खास विस्वासू बाळाराम झोरे यांनी विनंती करून मोरे साहेबांना मोरगिरी धनगरवाडी वरती पायी चालत आणले आणि परिस्थितीचा आढावा दिला बाळाराम झोरे साहेबांचे मोरे साहेबांनी मत ऐकून घेतलं आणि लगेचच त्यांनी पायी वाटेचे कच्या रोड मध्ये रूपांतर केले आणि अर्ध्यापर्यंत कच्चा रोड केला पुढे अजून न थांबता त्यांनी वेगवेगळ्या नेत्यांच्या मार्फत कच्चा रोड पूर्ण पने वाडीपर्यंत आणला आशा अनेक विकासात्मक गोष्टी बाळाराम झोरे यांच्या हातून घडल्या तालुक्यामध्ये प्रत्येक धनगरवाडीवर जाऊन अत्यावश्यक किट वाटप केले आणि त्यांचं आकस्मित निधन झालं स्व बाळाराम झोरे यांच्या बातमीने अख्या धनगरवाडीवर शोककळा पसरली दुःखाचा डोंगर कोसळला खूप मोठं योगदान त्यांनी या वाडीसाठी दिले होते पोलादपूर मधून अनेक महान नेते झाले व त्या नेतृत्वाने पोलादपूर तालुक्यातील जनतेच्या प्रश्नांसाठी आजन्म संघर्ष केला कोकणातील  विकासाचा अनुशेष असो की शाळा  असो ,रोजगार असो की रस्ते  शेतीचे प्रश्न असोत की सामाजिक प्रश्न असोत पण वर्तमानात पोलादपूरमध्ये संघर्ष करणाऱ्या नेतृत्वाची पोकळी जाणवते यातच एक आशेचा किरण दिसतो तो म्हणजे मा श्री कै बाळाराम झोरे यांच्या रूपाने जनतेची समस्या कोणतीही असो सरकारी की व्यक्तिगत प्रशासनाशी संबंधित की खाजगी त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सगळ्या ताकदीनिशी प्रयत्न करण्याचा मामाचा संघर्ष अनेकदा पाहायला मिळाला .

पोलादपूर तालुक्यातील जनतेसाठी संघर्ष करणारा  नेता बाळाराम झोरे साहेब आठवणीत असणारा महापूर आला असताना सरकारने शेतकऱ्यांसाठी मदत सुरू करण्यासाठी दाखवलेली मदत कार्य त्यासाठी जीवावर बेतनारी परिस्थिती आली तरी मागे हटायचे नाही हा निग्रह पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे महापुरात गरिबांना मदत असो अशा अनेक घटना सांगता येतील की ज्यात सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी केलेली प्रयत्नांची पराकाष्ठा दिसते.

साहेबांनी केलेला संघर्ष नेहमीच आदराचा आणि चर्चेचा मुद्दा असतो, कोविडच्या संकटात तर सतत लोकांना मदत करण्याचे काम सातत्यपूर्ण पद्धतीने चालूच होते  तरी लोकांची मदत थांबली नाही जेव्हा मामाच्या  सोबत बसतो तेंव्हा सतत भ्रमणध्वनी वाजतच असतो आश्चर्य तर याचे वाटते की लोक काय काय अडचणी मामाकडे घेऊन येतात शेतातल्या बांधाची भांडण, भावकितली भांडण , सासऱ्याची जावयाची भांडण ,कुणाच्या व्यक्तिगत अडचणी, सावकाराची तगादा या सगळ्यांना कोणतीही सत्ता नसताना सर्वतोपरी मदत  मामा कडून मिळते त्यांची बांधिलकी जनतेशी असते त्यामुळे राजकीय नुकसान झाले तरी त्याची त्यांना पर्वा नसते.

पोलादपूर तालुक्यातील जनतेसाठी संघर्ष करणारा  नेता; बाळाराम झोरे साहेब 

येणाऱ्या काळात पोलादपूर मामाच्या रूपाने एक संघर्ष पर्व हरपले ही तालुक्यातील  धनगर समाजातील पोकळी भरून येणार नाही .मामा तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली

No comments:

Post a Comment

टिटवाळा येथे सिद्धिविनायक मंदिरात भाविकांसाठी मोफत अन्नछत्र सुरू‌ !

टिटवाळा येथे सिद्धिविनायक मंदिरात भाविकांसाठी मोफत अन्नछत्र सुरू‌ ! *शिवसेना उपशहर प्रमुख विजय देशेकर यांचा स्तुत्य उपक्रम* टिटव...