Monday, 13 September 2021

कल्याण तालुक्यातील चार ठिकाणी लसीकरण केंद्रास जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची मंजुरी !श्रेयवाद उफाळला ?

कल्याण तालुक्यातील चार ठिकाणी लसीकरण केंद्रास जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची मंजुरी !श्रेयवाद उफाळला ?


कल्याण, (संजय कांबळे) : वरप,दहागाव, निळजे गोवेली ग्रामीण रुग्णालयात व उपकेंद्रे गोवेलीआदी लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी, मारामारी, हाणामारी यामुळे स्थानिक नागरिक लसीकरण करणापासून वंचित राहावे लागत होते. त्यामुळे नव्याने लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी होत होती. 


अखेरीस ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी तालुक्यातील चार ठिकाणी कोविड लसीकरणास नुकतीच मंजुरी दिली आहे. यामुळे आता येथील नागरिकांची सोय होणार आहे. असे असले तरी हे माझ्या मुळे झाले असा श्रेयवाद उफाळून आला आहे. त्यांना हे माहित नाही, ऐ पब्लिक है, जब जानती है!


कोरोनाकाळात अनेकांनी जीव गमावल्यानंतर जो तो लसीकरण करून घेण्यासाठी धडपड करु लागला. सुरुवातीला आँनलाईन लसीकरण नोंदणी असल्याने कोणी ही कुठेही लसीकरणासाठी जाऊ लागल्याने यातून वरप, दहागाव, गोवेली निळजे या लसीकरण केंद्रात तूफान 'राडा'होऊ लागला, प्रत्येक ठिकाणी स्थानिक व बाहेरून आलले असा संघर्ष सुरू झाला. काही ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागला होता. यामुळे हे थांबविण्यासाठी शासनाने पुन्हा आरोग्य उपकेंद्रे या ठिकाणी लसीकरण सुरू केले. परंतु येथेही थोडाफार वाद होऊ लागला. वरप केंद्र तर वादग्रस्त ठरु लागले होते. कल्याण तालुक्यातील म्हारळ, वरप कांबा या गावातील नागरिकांना काही वेळा वरप केंद्रात पण लस मिळत नव्हती. त्यामुळे म्हारळ गावासाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र प्रिती अँकेडमी महाविद्यालयात सुरू करावे अशी लेखी मागणी गावातील समाजसेवक महेश देशमुख व प्रिती अँकेडमी शाळचे व्यवस्थापक बंजरंग शर्मा यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भारत मासाळ यांच्या कडे केली होती. तसेच उल्हासनगर विधान सभा मतदारसंघाचे आमदार कुमारी आयलानी यांच्या कार्यालयात आमदार किसन कथोरे व सर्व अधिका-यांच्या उपस्थित एक बैठक झाली व यामध्ये म्हारळ येथे  लसीकरण केंद्र सुरू करा व त्यास मंजुरी द्यावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्या कडे केली होती. याचा पाठपुरावा पत्रकार संजय कांबळे यांनी ही केला होता. त्यामुळे अखेरीस जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी तालुक्यातील नागरिकांची गरज व आवश्यकता ओळखून कल्याण मधील म्हारळ गावातील प्रिती अँकेडमी महाविद्यालय,जिल्हा परिषद शाळा काकडपाडा, खोणी ग्रामपंचायत आणि जिप शाळा वाकळण या चार केंद्रास मंजुरी दिली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांची सोय होणार आहे.आता मोठी लोकसंख्या असलेल्या म्हारळ गावातील प्रत्येक नागरिकांना कोविड लस मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करुया, फक्त यामध्ये काही राजकारण नको व्हायला, अन्यथा मिळालेल्या मंजुरी मध्ये काही अडचणी नको यायला, मग देवच पावला.

असे असले तरीही लोकांचे हित न पाहता हे माझ्या मुळे,आमच्या साहेबामुळे झाले आहे अशी छाती बडवून घेतली जाते आहे.यांना हे माहित नाही, ऐ पब्लिक है, पब्लिक, बाबू सब जानती है !

No comments:

Post a Comment

टिटवाळा येथे सिद्धिविनायक मंदिरात भाविकांसाठी मोफत अन्नछत्र सुरू‌ !

टिटवाळा येथे सिद्धिविनायक मंदिरात भाविकांसाठी मोफत अन्नछत्र सुरू‌ ! *शिवसेना उपशहर प्रमुख विजय देशेकर यांचा स्तुत्य उपक्रम* टिटव...