Monday, 13 September 2021

कल्याण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्यांला एक लाखाची लाच घेतांना रंगेहात अटक !!

कल्याण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्यांला एक लाखाची लाच घेतांना रंगेहात अटक !!


कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण सार्वजनिक बांधकाम विभागाचा शाखा अभियंता अविनाश पांडुरंग भानूशाली याला एक लाखाची लाच घेतांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. त्यामुळे ऐण गौरी गणपतीच्या सणात खळबळ उडाली आहे.


कल्याण मुरबाड महामार्गावर असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये काम करणारा शाखा अभियंता अविनाश पांडुरंग भानूशाली यांच्या कडे मुंबई वडोदरा एक्स्प्रेस मध्ये रायते गावातील बाधित जमिनीचे काही शेतकऱ्यांचे मुल्यांकन करण्याचे काम होते. यासाठी यांनी मुल्यांकन चा अहवाल देण्यासाठी एक लाख रुपये लाच मागितली होती. ती स्विकारताना आज ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिसांनी रंगेहात साफळा लाऊन पकडले आहे. या अगोदर याने ४ लाख रुपये स्विकारले होते. तसे त्याने कबुली दिली आहे. जो पर्यंत राहिलेले १ लाख रुपये देत नाही तोपर्यंत रिपोर्ट देणार नसल्याचे तक्रारदारास सांगितले होते. त्यामुळे अखेरीस त्यांनी लाचलुचपत विभागात तक्रार केली व आज लाचेचे एक लाख रुपये घेताना भानूशाली याला पकडले.

सध्या सर्वत्र गौरी गणपतीच्या आगमणामुळे वातावरण मंगलमय बंनले असताना दुसरीकडे कडे या सरकारी बाबूना 'खाबुगिरी'चे पडले आहे. निदान यापुढे तरी विघ्नहर्ता या लोकांना सुदबुध्दी देवो हीच प्रार्थना.

No comments:

Post a Comment

टिटवाळा येथे सिद्धिविनायक मंदिरात भाविकांसाठी मोफत अन्नछत्र सुरू‌ !

टिटवाळा येथे सिद्धिविनायक मंदिरात भाविकांसाठी मोफत अन्नछत्र सुरू‌ ! *शिवसेना उपशहर प्रमुख विजय देशेकर यांचा स्तुत्य उपक्रम* टिटव...