Sunday, 12 September 2021

पुणे ग्रामीण, पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहर या भागात सध्या बलात्कार व गुन्हे वाढत चालले आहे याबाबत कडक व ठोस कार्यवाही करावी :- अजित प्रकाश संचेती, भारतीय राष्ट्रवादी पार्टी.

पुणे ग्रामीण, पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहर या भागात सध्या बलात्कार व गुन्हे  वाढत चालले आहे याबाबत कडक व ठोस कार्यवाही करावी :- अजित प्रकाश संचेती, भारतीय राष्ट्रवादी पार्टी.


पुणे, दिनांक :- 11/09/2021 :
पुणे शहर,पुणे ग्रामीण व पिंपरी चिंचवड शहर या मागील आठवड्या पासून बलात्कार व बाकीच्या गुन्हेगारी मध्ये वाढ होताना दिसत आहे, अशा गुन्हा बाबत कडक कार्यवाही करण्यात यावी.


पुणे शहर पोलीस आयुक्त ,ग्रामीण पोलीस अधीक्षक व पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्त हे आल्यापासून बऱ्याच प्रमाणात गुन्हे कमी झाले होते व या सर्वांचा गुन्हेगार यांच्या वर वचक बसली होती व यांचे नाव ऐकताच गुन्हेगार गार पडायचे पण अलिकडील काळात हे गुन्हे वाढत चालले आहेत, असे वाटत आहे की या सर्व आयुक्ताना त्यांच्या कामात किंवा त्यांच्या नियोजनामध्ये राजकीय दबाव तर येत नसेल ना ? या मागील आठवड्यात 4 ते 5 बलात्कार घटना  घडल्या आहेत, जनतेच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे व त्यात लहान मुली असो किंवा महिला या रस्त्यावर किंवा घरा बाहेर पडण्यासाठी घाबरत आहे आशी परस्थिती राहिली तर अवघड होऊन जाईल या साठी तीनी ही पोलीस आयुक्तांना यासाठी अजून पूर्ण ताकत आणि अधिकार द्द्यावेत या मुळे अजून जास्त प्रमाणात अशे गुन्हे घडणार नाहीत याबाबत योग्य ते नियोजन करावे असे निवेदन भारतीय राष्ट्टवादी पार्टीचे महाराष्ट्र संपर्क प्रमुख, मंत्री अजित संचेती यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना दिले आहे.

अजित संचेती : 9172207776

No comments:

Post a Comment

वी नीड यू सोसायटीचे २०२४चे शिक्षण, समाज व कार्यव्रती पुरस्कार जाहीर !!

वी नीड यू सोसायटीचे २०२४चे शिक्षण, समाज व कार्यव्रती पुरस्कार जाहीर !! ठाणे, प्रतिनिधी : वी नीड यू सोसायटी संस्थेतर्फे समाजात ‘व...