Friday, 19 June 2026

कल्याण डोंबिवलीत फेरीवाल्यांवर कडक कारवाई; क प्रभाग क्षेत्र फेरीवाला मुक्त !!

कल्याण डोंबिवलीत फेरीवाल्यांवर कडक कारवाई; क प्रभाग क्षेत्र फेरीवाला मुक्त !!

कल्याण, सनी लोंढे (दि. १९/०६/२०२६)

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील क प्रभागात अनधिकृत फेरीवाल्यांवर महापालिकेने धडक कारवाई केली. प्रभाग क्षेत्र अधिकारी धनंजय थोरात यांच्या नेतृत्वाखाली पथक प्रमुख संतोष माहिडा व त्यांच्या पथकाने स्टेशन रोड परिसरासह क प्रभाग हद्दीतील अनधिकृत फेरीवाले हटवून परिसर फेरीवाला मुक्त केला.

*जबर वचक बसवली*  
महापालिका पथकाने स्टेशन रोड परिसरात ठाण मांडून बसलेल्या फेरीवाल्यांवर कायद्याची जबर वचक बसवली. कारवाईदरम्यान अनेक अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे संपूर्ण परिसरातील अतिक्रमण दूर होऊन वाहतूक व पादचाऱ्यांना मोकळी जागा मिळाली.

*पथकाचे योगदान*  
या कारवाईत पथक प्रमुख संतोष माहिडा यांच्यासह त्यांचे सहकारी पवार, परमार व शेवाळे यांनी मोलाचे योगदान दिले. प्रभाग क्षेत्र अधिकारी धनंजय थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने ही कारवाई पार पाडली.

महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, अनधिकृत फेरीवाल्यांमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासावर नियंत्रण आणण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया नियमितपणे सुरू राहतील. नियमबाह्यपणे ठाण मांडणाऱ्या फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीत फेरीवाल्यांवर कडक कारवाई; क प्रभाग क्षेत्र फेरीवाला मुक्त !!

कल्याण डोंबिवलीत फेरीवाल्यांवर कडक कारवाई; क प्रभाग क्षेत्र फेरीवाला मुक्त !! कल्याण, सनी लोंढे (दि. १९/०६/२०२६) कल्याण डोंबिवली...