विवाहीतेवर बलात्कार करून जिवे ठार मारणाऱ्या लिंगपिसाट नराधमास भरचौकात फाशी द्या.!!
_*अन्याय अत्याचार निर्मुलन समितीची मागणी..*_
मुंबई, (प्रतिनिधि) : साकीनाका मुंबई येथील विवाहीत महीलेवर बलात्कार करून जिवे ठार मारणाऱ्या लिंगपिसाट नराधमांवर जलदगती न्यायालयात खटला सुरु करून भरचौकात फाशी द्यावी अशी मागणी अन्याय अत्याचार निर्मुलन समिती या सामाजिक संघटनेच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाव्दारे करण्यात आली आहे. सदरची घटना माणुसकीला काळीमा फासणारी असुन या घटनेचा समितीच्या वतीने जाहीर निषेध करण्यांत आला आहे.
अंधेरी साकीनाका मुंबई या गजबजलेल्या परिसरात एका विवाहीत महिलेला बेदम मारहाण करण्यात येते, तिच्यावर अमानुषपणे बलात्कार करुन जिवेठार मारले जाते ही घटना अतिशय भयावह व निंदनीय असुन या घटनेचा समितीच्या वतीने राज्यभर तीव्र निषेध नोंदवण्यात येत आहे. पिडीताच्या वारसांना शासनामार्फत जास्तीत जास्त आर्थिक मदत देवुन त्यांचे कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात यावे. संबंधित आरोपीवर एक महिन्यात आरोपपत्र दाखल करण्यात येवुन जलदगती न्यायालयात सदर गुन्ह्याचा खटला चालविण्यात यावा. फिर्यादीच्या वतीने विशेष सरकारी वकीलांची नेमणूक करण्यात यावी. अशी मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. या घटनेच्या निषेध पत्रकावर अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे प्रदेशाध्यक्ष मा.रविंद्रदादा जाधव, प्रदेश कार्याध्यक्ष डाॅ.रमेश सावंत, प्रदेश सरचिटणीस मा.महेंद्र उर्फ अण्णासाहेब पंडीत, प्रदेश उपाध्यक्षा प्रा.प्रेमलताताई जाधव, प्रदेश संपर्क प्रमुख प्रदेश संघटक श्रीमती भावनाताई थोरात, प्रा.अर्चनाताई जागुष्टे, प्रदेश सचिव सरस्वतीताई बागुल, प्रदेश सहसचिव सुनिल उकीरडे, प्रदेश सल्लागार अँड.बाळासाहेब जंगम, भिमराव मेश्राम, ममताताई पुणेकर, वसंतराव वाघ, कोकण विभागीय अध्यक्ष संतोष चाळके, ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष रवी गमरे, नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख संदीप साबळे, रायगड जिल्हाध्यक्ष दिनेश भालेराव आदिंच्या सह्या आहेत.
मा.महेंद्र (अण्णा) पंडित : 87797 43002
No comments:
Post a Comment