भिवंडीत नऊ लाख रू किंमती प्रतिबंधित गुटख्यासह कार -टेंम्पो जप्त ; पान टपऱ्यानवर खुलेआम विक्री.!!
भिवंडी, दिं,22, अरुण पाटील (कोपर) :
भिवंडी तालूक्यात गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा, सुगंधित पान मसाला व सुगंधित तंबाखू हा गोडाऊन पट्ट्यात येतो तर काही माल हा थेट भिवंडी शहरात असलेल्या विविध गोडाऊन मध्ये उतरवला जात असतो. अशाच प्रकारे शहरातील नदी नाका परिसरात टेंम्पो व कारमध्ये प्रतिबंधित गुटखा व सुगंधित पान मसाला येणार असल्याची माहिती भिवंडी क्राईम ब्रँच शाखेला मिळाली असता त्यांनी अन्न व औषध विभागाच्या सयुंक्तिक कारवाईत टेंम्पो व कार जप्त केली.
ही कारवाई भिवंडी क्राईम ब्रँचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनेमाने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली होती. या कारवाईत टेंम्पो क्रं, एम.पी.-9, जी.जी.-4024, मधून 30 गोणी प्रतिबंधित गुटखा जप्त केला, त्याची किंमत 9 लाख 31हजर 840 रू. असून टेम्पोची किंमत 8 लाख रू.असून पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात पोलिसांनी ड्राइवर व क्लिनरला ताब्यात घेतले.
पोलिसांनी या दोघांनकडे अधिक चैकशी केली असता त्यांनी इंडिका कार क्रं. जी.जे.-15, सी. जे. -6108 येत असून त्याच्यात देखील हाच माल असल्याची माहिती दिली असता पोलिसांनी सदर 5 लाख रू. किंमती कार व 22 लाख 31 हजार 840रू. किंमती मुद्देमाल जप्त केला असून पोलिसांनी या सर्वांनवर गुन्हा दाखल केला आहे.
हा गुटखा,सुगंधित पान मसाला व तंबाखू
शहर व परिसरातील पान टपऱ्यानवर खुलेआम विक्री केला जात असून अशाच प्रकारे नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पूर्णा गाव, जे के पेट्रोल पंपा शेजारी असलेल्या श्री. गणेश जनरल स्टोर व काल्हेर येथील बीजेपी कार्यालया जवळ मुख्य रस्त्यावर असलेल्या अंबिका जनरल स्टोर तसेच राजलक्ष्मी कॉम्प्लेक्स येथे गुडलक जनरल स्टोर येथे
प्रतिबंधित गुटखा, सुगंधी पान मसाला व सुगंधित तंबाखू खुलेआम विकला जात असून येथूनच नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्वच पान टपऱ्यावर खुलेआम विकला जात असून या बाबत कोणतीच ठोस कारवाई नारपोली पोलिसांनकडून होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.


No comments:
Post a Comment