Wednesday, 22 September 2021

ठाणे जिल्ह्यात पावसाळ्यात पाऊस आला धाऊन, पाणी गेले वाहून तर उन्हाळ्यात नदी आमच्या उशाला कोरड पडली घशाला?

ठाणे जिल्ह्यात पावसाळ्यात पाऊस आला धाऊन, पाणी गेले वाहून तर उन्हाळ्यात नदी आमच्या उशाला कोरड पडली घशाला?


कल्याण, (संजय कांबळे) : पावसाळ्यात सर्वाधिक पाऊस ठाणे जिल्ह्यात पडतो परंतु पाणी आडवा पाणी जिरवा या संकल्पनेला नैसर्गिक वातावरणासह येथील मानसिकता साथ देत नसल्यानेआणि राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आदी कारणांमुळे उन्हाळ्यात नदी आमच्या उशाला असून देखील पाण्याअभावी कोरड पडतीया घशाला, अशी केविलवाणी अवस्था झाली आहे.


ठाणे जिल्हा हा कोकणातील प्रमुख व सर्वात मोठा जिल्हा आहे. या जिल्ह्यात शहरी तालुक्यासह शहापूर, मुरबाड सारखे ग्रामीण मागासलेले तालुके पण आहेत. जिल्ह्यातील बारवी व भातसा ह प्रमुख धरण आहेत पण येथून मुंबई, नवीमुंबई सारखे मोठ्या शहरांना पाणी पुरवठा केला जातो. जिल्ह्यातील डोंगर व तीव्र उताराच्या टेकड्यावरुन वाहणाऱ्या नद्या या ताबडतोब समुद्राला मिळत असल्याने तसेच येथील दगड हा काळाकुट्ट कठिण, व पाणी साठवण क्षमता नसणारा असल्याने तीव्र उतारामुळे पावसाचे पाणी वाहून जाते. 


येथील नद्या या पहिल्या स्टेप मध्ये येत असल्याने २०१८ मध्ये दुष्काळ पडला होता. केवळ कल्याण तालुक्याचा विचार केला तर तालुक्यात उल्हास, बारवी, भातसा, आणि काळू अशा चार नद्या आहेत ,सर्वाधिक पाऊस कल्याण, भिवंडी, मुरबाड, शहापूर अंबरनाथ आदी तालुक्यात पडतो. पण उन्हाळ्यात प्यायला पाणी मिळत नाही. याचा अर्थ भूजल सर्वेक्षण, भूवैज्ञानिक विभाग, लघुपाटबंधारे, कृषी आदी विभागाने भूजल पातळी वाढावी म्हणून प्रयत्न केले नाहीत असे नाही. जलजीवनमिशन, शिवकालीन पाणी साठवण योजना, सिंमेट बंधारे, वनराई बंधारे, शेततळी, जलसंधारणची कामे, भूजल पुनर्भरणा, रेन वाँटर हाँरवासवटिग,आदींचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण ४१८ कुपनलिका आहेत, तर खाजगी लाखोंच्या संख्येने असतील, तर हातपंपाची संख्या ३ हजार ८८९ इतकी आहे.


पण नळपाणी योजनेतील भ्रष्टाचार, भूजल पुनर्भरणाकडे सोईस्कर केलेले दुर्लक्ष, विशेष म्हणजे भूजल पुनर्भरणासाठी एम आरजीएस तसेच १४/१५व्वा वित्तआयोगातून खर्च करण्याची तरतूद असताना ग्रामपंचायतीनी झटकले हात, ठाणे जिल्ह्यात पाच तालुक्याचा विचार केला तर भिवंडी तालुक्यात अद्यापही भूजल पुनर्भरना काम झाले नाही. जमीनीला पाडणारे भोके, यातून होणारा पाणी उपसा, भूजल अधिनियम२००९ चे सर्रास होणारे उल्लंघन, पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेले बंधारे, छोटे धरण, फुटलेले बांध, यांच्या दुरुस्ती कडे होणारे दुर्लक्ष, राजकीय इच्छा शक्तीचा अभाव आदी कारणांमुळे आज जिल्ह्यात उन्हाळ्यात वाड्या वस्ती वरील नागरिकांना डब-याचे पाणी प्यावे लागते. हे कोणी नाकारु शकतो का? हे बदलायचे असेल तर आपली मानसिकता बदलने गरजेचं आहे, पाण्याचे महत्त्व ओळखून जास्तीतजास्त पाणी जमिनीत कसे मुरवता येईल, भूजल पुनर्भरणा कार्यक्रम कसा यशस्वी करता येईल याचा सर्वांनी कृतीतून विचार व्हायला हवा.

*प्रतिक्रिया : 'जलजीवनमिशन अंतर्गत सोळाशे विद्यार्थ्यांना भूजलपातळी कशी वाढवता येईल यांचे प्रशिक्षण दिले'- श्रीमती सपना बोरकर (भूवैज्ञानिक, ग्रामीण पाणी पुरवठा, जिप ठाणे)

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !!

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !! ...