Wednesday, 22 September 2021

ठाणे जिल्ह्यात वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या एक लाख १६ हजार वाहन चालकांना नोटीस !! "२५ सप्टेंबरला लोक अदालत" ; "नंतर होणार वाहन जप्तीची कारवाई"

ठाणे जिल्ह्यात वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या एक लाख १६ हजार वाहन चालकांना नोटीस !!

"२५ सप्टेंबरला लोक अदालत" ; "नंतर होणार वाहन जप्तीची कारवाई" 


संजय कांबळे, कल्याण : वाहतुकीचे नियम पायदळी तुडविल्यांवर वाहन चालक वाहतूक शाखेने आकारलेल्या दंडाची रक्कम भरणे वर्षानुवर्ष टाळतात. अशाच ठाणे जिल्ह्यातील एक लाख १६ हजार वाहन चालकांना वाहतूक शाखेने नोटीस बजावली आहे. त्यातील तडजोड शुल्क २३ सप्टेंबरपर्यंत भरा, अन्यथा २५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीत हजर रहावे, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.


या नोटीस कडे कानाडोळा करणारे पुन्हा वाहतूक पोलीसांच्या कारवाईत आढळल्यास वाहन जप्त करून त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. त्यामुळे दंडाबरोबर पुढील कारवाईलाही सामोरे जावे लागणार आहे. नवी दिल्ली राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशाप्रमाणे ठाणे जिल्ह्यातील सर्व न्यायालयात २५ सप्टेंबर २०२१ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे. त्या अनुषंगानेच जिल्हा व तालुका न्यायालयीन क्षेत्रातील न्यायालयातील तडजोड पात्र फौजदारी प्रकरणे लोकअदालतीमध्ये ठेवण्यात येणार आहेत.  

वाहतूक नियमांचे उल्लंघन करून कारवाई केलेल्या नागरिकांकडून वर्षानुवर्ष दंड भरलेला नाही, अशा वाहन चालकांना नोटीस बजावली आहे. त्यांनी जवळच्या वाहतूक उपविभागात तडजोड रक्कम भरण्याबाबत सुचना केल्या आहेत.  ज्या नागरिकांना तडजोड शुल्क मान्य नसेल, त्यांनी २५ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालत जवळच्या न्यायालयात हजर रहावे. असे आवाहन ठाणे जिल्हा वाहतूक विभागातर्फे करण्यात आले आहे. 

वाहतूक शाखेचे उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे म्हणाले की, वाहतूक नियमांचे उल्लंघन करून दंड भरण्यास टाळाटाळ करतील आणि पुन्हा वाहतूक पोलीसंच्या कारवाई दरम्यान आढळून येतील अशांवर दंडात्मक कारवाई सह कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !!

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !! ...