कचर्याच्या ढिगार्यावर लावणार आभार प्रदर्शनाचे फलक - 'विजय देशेकर'
"परिसरातील कचरा उचलत नसल्याने झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न"
टिटवाळा : टिटवाळा परिसरातील कचरा नियमितपणे उचलला जात नसल्याने ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचून पडले आहेत.
या साचलेल्या कचर्याच्या ढिगार्यावर पालिका अधिकाऱ्यांचे आभार प्रदर्शित करणारा फलक टिटवाळा एज्युकेशन कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष विजय देशकर लावणार असून प्रशासना कडून नियमितपणे कचरा उचलला जात नसल्याने अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आगळा वेगळा उपक्रम सुरू केला आहे. सिद्धिविनायकाचे प्रसिद्ध देवस्थान म्हणून महाराष्ट्रातील अनेक भाविक टिटवाळा येथे येत असतात परंतु येतील दुर्गंधी आणि कचरा पाहून नाराजी व्यक्त करतात टिटवाळा परिसरातील कचरा नियमितपणे उचलला जात नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. तसेच पावसाळा असल्याने येथील कचऱ्यामध्ये पाणी साठवून डेंगू मलेरियाचे डास या कचरा कुंड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. आरोग्य विभागातील अधिकारी कचरा समस्येकडे गांभीर्याने पाहत नसून दुर्लक्ष करीत आहेत प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता तसेच अनेकदा पत्रव्यवहार करून सुद्धा पालिका अधिकारी लक्ष देत नसल्याने हे पाऊल उचलले असल्याचे देशकर यांनी सांगितले आहे.
नागरिकांनी आपल्या परिसरातील ज्या ठिकाणचा नियमित कचरा उचलला जात नाही. अशा कचर्याच्या ढिगार्याचे फोटो व व्हिडिओ टिटवाळा एज्युकेशन कल्याणकारी संस्थेकडे पाठविण्याचे आवाहन केले आहे कचऱ्याच्या ढिगार्यावर संस्थेकडून आभार प्रदर्शित करणारा बॅनर मोफत नागरिकांना देण्यात येणार आहे अशी माहिती देशकर यांनी दिली आहे.
त्यांच्या या आवाहनाला टिटवाळा येथील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला असून अनेकांनी फोटो व व्हिडीओ पाठविण्यास सुरुवात केली आहे.
प्रशासन मात्र ढिम्म असून अध्यापक कचरा उचलण्यास सुरुवात न केल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.



No comments:
Post a Comment