अन्याय अत्याचार निर्मुलन समिती महाराष्ट्र राज्य व मुंबई प्रदेश कार्यकारिणीचा संवाद मेळावा व पदग्रहण सभारंभ संपन्न..!
ठाणे, (प्रतिनिधी) : अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचा महाराष्ट्र राज्य व मुंबई प्रदेश कार्यकारिणीचा संवाद मेळावा व पदग्रहण सभारंभ समितीचे प्रदेशाध्यक्ष *मा.रविंद्रदादा जाधव* यांचे अध्यक्षतेखाली हाॅटेल विहांग्ज-ईन, घोडबंदर रोड, ठाणे येथे खेळीमेळीच्या वातावरणात नुकताच संपन्न झाला.
संवाद मेळाव्याचे स्वागताध्यक्ष *डाॅ.रमेशजी सावंत* यांनी उपस्थित अतिथी व पदाधिकाऱ्यांचे गुलाबपुष्प, शाल देऊन यथोचित स्वागत केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना प्रदेशाध्यक्ष *रविंद्रदादा जाधव* म्हणाले की, मानवसृष्टीच्या निर्मितीपासुन पृथ्वीवर एखाद्याकडे गरजेपेक्षा जास्त पैसा व ताकद असलेल्या घटकांकडुन प्रतिष्ठा संपती व सत्तेची लालसा टिकवण्याकरीता गरीब उपेक्षित घटकांवर साम, दाम, दंड, भेद या नितिचा अवलंब करून अन्यायाविरुद्ध उठणारे आवाज दाबुन चिरडले जातात व रक्तपात ही केला जातो अशा शोषित पिडीत, उपेक्षित घटकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध *अन्याय अत्याचार निर्मुलन समिती* जात पात धर्म पंथ न बघता अन्याग्रस्तांच्या सोबतीला कुठल्याही फळाची अपेक्षा न करता खंबीरपणे उभी राहुन मदत करते. असे प्रतिपादन रविंद्रदादा जाधव यांनी केले.
पहिल्या सत्रात शिक्षक दिनाचे औचित्य साधून सेवानिवृत्त मुख्याध्यापिका *अनुराधाताई जाधव, प्रा.प्रेमलताताई जाधव, प्रा. अर्चनाताई जागुष्टे* यांना शाल फेटा गुलाबगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
या संवाद मेळाव्याच्या विचारपिठावर प्रदेशाध्यक्ष *रविंद्रदादा जाधव,* यांचे सह प्रदेश उपाध्यक्षा *प्रा.प्रेमलताताई जाधव,* प्रदेश सरचिटणीस *महेंद्र तथा अण्णासाहेब पंडीत,* प्रदेश संघटक *प्रा.अर्चनाताई जागुष्टे,* उ.महा.उपाध्यक्ष *वसंतराव वाघ,* उ.महा.कार्याध्यक्ष *प्रदीपनाना गांगुर्डे,* कोकण विभाग प्रमुख *संतोष चाळके,* उ.महा. कोषाध्यक्ष *जसपालसिंग कोहली* आदी मान्यवर उपस्थित होते.
बालकवी *करण भदर्गे* यांचे स्वागत गीताने प्रथम सत्राचा प्रारंभ करण्यात आला. उ.महा. कार्याध्यक्षा *वैशाली जाधव* यांनी प्रास्ताविक करतांना समितीची कार्यप्रणाली व कामकाजाचा आढावा प्रस्तुत केला.
संवाद मेळाव्यात समितीच्या "महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष" या महत्त्वपूर्ण पदाचा कार्यभार *डॉ. रमेश सावंत.* यांना सोपविण्यात आला. सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी डॉ. सावंत हे "केंद्रीय सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी, विभागाच्या केंद्रीय संचालक पदावर कार्यरत होते. सेवानिवृत्त महिला बालकल्याण अधिकारी *सरस्वतीताई बागुल-भास्कर* यांचेवर राज्य-सचिव पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
तसेच मुंबई प्रदेश कार्याध्यक्षपदी *मोहम्मद समीर कलुडी,* ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष पदावर *रवि गमरे,* ठाणे जिल्हा-सरचिटणीस पदी *सुनिल वाघ* अंधेरी तालुकाध्यक्ष *सूर्यकांत शिंदे* अंधेरी तालुका सरचिटणीस *उत्तमराव ढाले* तसेच महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख पदावर *भावनाताई थोरात पुणे*, मुंब्रा विभाग अध्यक्ष *राजु दोंदे* मुंब्रा विभाग सचिव *प्रणय घोरपडे* यांचे सह दिवा शहर अध्यक्ष *दिनेश पवार* दिवा शहर सचिव *दिलीप गमरे* कल्याण तालूका सचिव *आनंद गांगुर्डे* कल्याण तालूका संघटक *हरुन सैय्यद* अंबरनाथ तालूका महीला अध्यक्ष *गायत्री चव्हाण* यांच्यासह तिस पदाधिकाऱ्यांचा मुंबई उपनगरातील विविध विभागातील कार्यकारिणीवर समावेश करुन रविंद्रदादा जाधव यांच्या हस्ते उपस्थितांच्या साक्षीने पदग्रहण करण्यात आले.
या वेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधून समितीचे ध्येय उद्देश व सामाजिक अडीअडचणी संदर्भात चर्चा करण्यात येवुन त्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या बैठकीत ममताताई पुणेकर, रायगड जिल्हाध्यक्ष दिनेश भालेराव, शशीभाऊ जाधव, राधाताई शिरसागर, निर्मला गायकवाड, सुहास पवार, संतोष कदम, रमेश खिल्लारे, आनंद गांगुर्डे, रेखा जाधव, शिलाताई जाधव, कोमल जाधव, बाळासाहेब शिरसागर, रोहीत गायकवाड, निर्मला गायकवाड, दिनेश पवार आदींसह असंख्य पदाधिकारी कार्यक्रमास उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन *प्रदीपनाना गांगुर्डे* यांनी केले. *अण्णासाहेब पंडीत* यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार माणुन राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
No comments:
Post a Comment