पंचरत्न मित्र मंडळ चेंबुरतर्फे दानशूर व्यक्ती/संस्थांना मदतीसाठी आवाहन !!
'महाडमधील तांबड भुवन गावातील पुरग्रस्तांना होणार २६ सप्टेंबरला मदत'
मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) :
सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय, बौद्धिक इ. क्षेत्रांत लोककल्याणार्थ कार्यरत असलेल्या सेवाभावी संस्था. या संस्थांची संघटना एका विशिष्ट हेतूने व उद्दिष्टासाठी केलेली असते आणि त्यांत काम करणारे स्वयंसेवक स्वेच्छेने व निःस्वार्थीपणे कोणतेही काम व मदत करण्यास तत्पर असतात. या संघटना प्रामुख्याने नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींत सापडलेल्यांना साहाय्य करतात; प्रसंगी आर्थिक मदतही देतात. यांशिवाय लोकांना मूलभूत हक्कांची जाणीव करून देणे, नागरी सुविधांबद्दल जागरूक करणे, बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यास साहाय्य करणे तसेच अन्य अनेक समस्यांची सोडवणूक करण्यासाठी सहकार्य करण्याचे काम पंचरत्न मित्र मंडळतर्फे गेली अनेक वर्षे केले जात आहे.नोकरी,व्यवसायाच्या निमित्ताने कोकण सोडून मुंबईत आलेल्या मात्र कोकणाचे म्हणजेच आपल्या जन्मभूमी ऋण फेडण्यासाठी सामाजिक, शैक्षणिक ,वैद्यकीय ,पर्यावरण क्षेत्रात सातत्याने गेली अनेक वर्ष कार्यरत असलेल्या आर.सी.एफ कर्मचारी वर्गाच्या पंचरत्न मित्र मंडळ (रजि.) चेंबुरतर्फे अध्यक्ष-अशोक भोईर ,सचिव प्रदिप गावंड, खजिनदार सचिन साळुंखे यांच्या प्रयत्नाने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. मंडळाची स्थापना २००६ मध्ये करण्यात आली असून आजपर्यंत मंडळाच्यावतीने मुंबईसह उपनगरात व महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अनाथश्रम, वृध्दाश्रम व खेडेगावातील तसेच आदिवासी भागातीलशाळांमध्ये शालेय साहित्य वाटप व आरोग्य शिबिर आणि वृक्षारोपण तसेच विविध स्पर्धांचेही आयोजन केलेले आहे. कोविड-१९ काळातही लाँकडाऊन सुरु झाल्यापासून अनेक ठिकाणी अन्नधान्य वाटप करण्यात आले. आता महाडमधील दुर्गम भाग असलेल्या तांबड भुवन गावातील पुरग्रस्तांना मंडळाच्यावतीने २६ सप्टेंबर २०२१ रोजी कर्तव्य म्हणून मदतीचा हात देण्याचे ठरवले आहे. समाजातील दानशुर व्यक्ती/संस्था मंडळ यांच्यातर्फे मदतीची आवश्यकता आहे. तांदूळ, गहू, सतरंजी, ब्लँकेट, मसाले, साबण, तेल, चहा पावडर, साखर,चादरी, सर्व प्रकारच्या डाळी, कडधान्ये, ट्युथपेस्ट, खोबरेल तेल आदींची मोठ्या प्रमाणात गरज आहे. तरी आर्थिक किंवा वस्तू स्वरुपात मदत देण्यासाठी इच्छुकांनी अशोक भोईर- ९८६७३४५०५५/ प्रदिप गावंड- ९८६७९६९८३६/सचिन साळूंखे- ८०९७०७४८०४/ वैभव घरात- ९१६७९१२२४६/ रमेश पाटील- ९९3०८२३१४०/मरविन डिमोलो- ९८६९२२१२९२ यांच्याशी संपर्क साधावा किंवा सारस्वत बँक, खाते क्र. SB270200100001477 - IFSC Code - SRCB0000270 मध्ये धनादेश /रोख रक्कम जमा करण्याचे आवाहन पंचरत्न मित्र मंडळ अध्यक्ष अशोक भोईर यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment