स्व.बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक गंभीर आजाराने ग्रस्त,शिवसैनिकानी दिला मदतीचा हात !!
भिवंडी, दिं,11, अरुण पाटील (कोपर) :
स्व. बाळासाहेबांचे आयुष्यभर कट्टर शिवसैनिक म्हणून शिवसेना पक्षाची एक निष्ठ राहिलेल्या ६४ वर्षीय शिवसैनिक गंभीर आजाराने ग्रस्त आहेत. त्यांना उपचारासाठी स्वतःचे घर विकावे लागले. आता पदराचा पैसा संपल्याने कुटूंब हलाखीत जीवन जगत आहे. त्यामुळे शिवसैनिकाच्या मुलीने शिवसेना नेत्यांकडे वडिलांच्या उपचारासाठी याचना केली. तेंव्हा माहिती मिळताच शिव सैनिकांनी नंदकुमार सांवत यांना मदतीचाहात पुढे केला आहे.
ठाणे ग्रामीण शिवसेना उपजिल्हा प्रमुख तथा कशेळी गावचे माजी सरपंच व भिवंडी महानगर पालिकेचे नगरसेवक श्री.डॉ. देवानंद थळे यांनी सावंत कुटुंबाकडे धाव घेवून त्यांनी परिस्थिती जाणून घेवून मदतीचा हात दिला. तीन दिवसापूर्वी भिवंडी तालुक्यातील आमराई गावातील रामा नाऊ पडवळ यांचे घर अतिउष्ट्रीमुळे जमीनदोस्त झाले होते, तेंव्हा श्री. थळे यांनी 25 हजारांची मदत केली आहे.
नंदकुमार सावंत यांच्या उपचाराला येणार खर्च पालकमंत्री तथा नगर विकास मंत्री मा.श्री. एकनाथ शिंदे करणार आहेत. तर शिवसेना वैद्यकीय सेवा विभागातील डॉक्टरांचे पथक नंदकुमार सांवत यांच्या घरी जाऊन उपचाराबाबत माहिती घेणार आहेत. शिवसेनेत ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण हाच ध्यास नंदकुमार यांनी मनात ठेवला होता. नंदकुमार मूळचे रत्नागिरी जिल्ह्याचे रहिवाशी असून ते मुंबईतील करीरोड परिसरातच लहानाचे मोठे झाले. तर गोदरेज कंपनीत कार्यरत होते. मात्र कालातंराने मुंबई सोडून त्यांनी ठाण्यातील किसननगर भागात स्वतःचे घर घेऊन राहत होते.
मात्र उपचारासाठी त्यांना राहते घर विकावे लागले आहे. विशेष म्हणजे ऐन कोरोना काळात सांवत कुटूंब भिवंडी तालुक्यातील कशेळी गावात असलेल्या पद्मावती कॉम्प्लेक्समध्ये पाच नंबर इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहण्यास आले. आता मात्र उपचार आणि घर खर्च चालविणासाठी आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांची मुलगी श्रेया ही एका खाजगी कंपनीत काम करत आहे. या मदतीसाठी सावंत कुटुंबाने शिवसेना नेत्यांचे आभार मानले आहे.
No comments:
Post a Comment