डोंबिवलीतील विद्यार्थिनीने साकारल्या बाप्पाच्या मूर्त्या !!
डोंबिवली :- डोंबिवली पूर्वेकडील सुनील नगर येथील राधिका गोखले (१८) या विदयार्थीनीने पर्यावरणपूरक शाडूच्या मातीने बाप्पाच्या मूर्ती साकारल्या आहेत.
कोणतेही कलात्मक शिक्षण न घेता फक्त आपल्या श्रद्धेच्या जोरावर ही कामगिरी केल्यामुळे तिच्या ह्या कलेचं सर्व स्तरावर कौतुक होत आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे पर्यावरणाचे नुकसान होत असल्याने आपणही पर्यावरण प्रदूषण टाळण्यास थोडा हातभार लावावा या संकल्पनेतून मला ही कल्पना सुचली अशी प्रतिक्रिया कु. राधिका गोखले हिने दिली.
No comments:
Post a Comment