मुंबई -साकीनाका बलात्कार प्रकरनातील पीडितेची मृत्यूशी झुंज अखेर संपली, उपचारादरम्यान मृत्यू.!
भिवंडी, दिं,12, अरुण पाटील (कोपर) :
मुंबईतील अंधेरी परिसरातील साकीनाका येथे बलात्कार झालेल्या त्या पीडित महिलेची मृत्यूशी झुंज अखेर संपली. पीडित महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. मुंबईतील राजावाडी रुग्णालयात पीडित महिलेवर उपचार सुरू होते. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने पीडित महिलेची प्रकृती खूपच चिंताजनक होती. पीडितेवर डॉक्टरांकडून उपचार सुरू होते मात्र, दुर्देवाने तिचा मृत्यू झाला.
सैतानालाही लाजवेल असं कृत्य आरोपीने केलं होतं. पीडित महिलेला मारहाण करुन आरोपीने तिच्यावर बलात्कार केला होता. इतकेच नाही तर तिच्या गुप्तांगात रॉड टाकून गंभीर दुखापत केली होती.
आरोपीने भररस्त्यात उभ्या असलेल्या टेम्पोत हे कृत्य केलं होते. त्या परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपी मारहाण करत असल्याचं दिसून आल्याने या प्रकरणातील आरोपीला पोलिसांन अटक केली आहे. काही तासापूर्वीच पीडित महिलेच्या प्रकृतीची चौकशी महापौर किशोरी पेडणेकर यांनी रुग्णालयात जाऊन केली होती.
यावेळी महापौर किशोरी पेडणेकर यांनी माहिती दिली होती की, पीडित महिलेसोबत तिची आई आहे. पीडितेच्या आईने सांगितले की, गेली 10-12 वर्षां पासून जो इसम टेम्पोजवळ सापडला त्याच्यासोबत राहत होती आणि त्यांच्यात वारंवार भांडणे सुद्धा होत होती. त्यांच्यात सुरू असलेल्या भांडणाबाबत एका व्यक्तीने पोलिसांना फोन करुन सांगितले.
ज्या वेळी पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यावेळी पीडित महिला रक्तबंबाळ अवस्थेत टेम्पोत आढळून आली होती. पीडितेला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आरोपी मोहन चौहान याला पोलिसांनी अटक करण्यात आली असून त्याच्यावर विविध कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment