Saturday, 11 September 2021

वरपगावच्या गौरी पाटील हिचे ग्रपलिंग रेसलिंग स्टेट चँपियनशीप स्पर्धेत 'गोल्ड मिडल, अभिनंदनाचा वर्षाव !!

वरपगावच्या गौरी पाटील हिचे ग्रपलिंग रेसलिंग स्टेट चँपियनशीप स्पर्धेत 'गोल्ड मिडल, अभिनंदनाचा वर्षाव !!


कल्याण, (संजय कांबळे) : गोवेली येथील जीवनदिप महाविद्यालयाची विद्यार्थ्यांनी आणि पत्रकार संंजय कांबळे यांच्या एस के फिल्म प्रोडक्शन हाऊसची कोरीओग्राफर तथा आघाडी ची कलाकार कु. गौरी तुळशीराम पाटील हिने सोलापूर येथे झालेल्या महाराष्ट्र स्टेट ग्रपलिंग रेंसलिग चँपियनशीप स्पर्धेत 'गोल्ड मिडेल, पटकावून प्रथम क्रमांक मिळवला, तिच्या या यशाबद्दल संपूर्ण परिसरातून तिच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


कल्याण तालुक्यातील वरपगावातील अंत्यत सर्जनशील, विनंम्र, शांत प्रेमळ, मायाळू, चारित्र्यसपन्न, गुणवान व्यक्ती म्हणून कोणाला ओळखले जात असेल तर ते गोपाळ भोईर हे होय.


अशा या गोपाळ भोईर, प्रसन्ना भोईर (आजी) विजय भोईर (मामा) यांच्या कुंटूबात कु. गौरी तुळशीराम पाटील ही वरपगावातच लहानांपासून राहत होती, वरप गाव हे कुस्ती शौकिनांचे गाव म्हणून परिसरात परिचित होते. या गावचे वस्ताद पै रवी भोईर यांनी अनेक पैलवान घडवले आहेत. यामध्ये कु. गौरी पाटील हिचा देखील समावेश आहे. तिला लहानपणापासून कुस्ती, डांन्स, अभिनय, याची विशेष आवड होती. संस्थापक अध्यक्ष रवींद्र घोंडविदे यांच्या जीवनदिप महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात गौरी हि विविध नाटक, डांन्स मध्ये कायम सहभागी होत असे.


घरची आर्थिक परिस्थिती अंत्यत बेताची असल्याने तिला शिक्षणात अनंत अडचणी आल्या. परंतु आजोबा गोपाळ भोईर, आजी प्रसन्ना भोईर, आई संध्या पाटील, मामा विजय भोईर हे सर्व वेळोवेळी तिचा पाठीशी खंबीरपणे उभे राहिले म्हणून तिने यशस्वी वाटचाल सुरू केली. तिचे अभिनय व डांन्स मधील कलागुण पाहून एस के फिल्म प्रोडक्शन हाऊसचे प्रमुख पत्रकार संजय कांबळे यांनी तिला अनेक संधी, व्यासपीठ, उपलब्ध करून दिले. इतकेच नव्हे तर तिला टिमची कोरोग्राफर व आघाडीची कलाकार म्हणून निवड केली.


गेल्या दिड दोन वर्षाच्या कोरोनाच्या संकटामुळे, शासनाच्या निर्बंधांंमुळे एस के फिल्म प्रोडक्शन हाऊसचे काम थांबले होते. या कालावधीत गौरी हिने कुस्तीकडे लक्ष दिले, पै. माधवी कुर्ले हिच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील सोलापूर येथील महाराष्ट्र स्टेट ग्रपलिंग रेसलिंग चँपियनशीप स्पर्धेत तिने भाग घेऊन ५३ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावला आणि मानाच्या अशा गोल्ड मेडलवर आपले नाव कोरले. तिच्या या यशाबद्दल ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, जेष्ठ अभिनेते जयवंत वाडकर, अभिनेते संजय जाधव, मंगेश सातपुते, पत्रकार तथा टिमप्रमुख संजय कांबळे व संपूर्ण टिम, उंबार्डे, सापाडचे सामाजिक कार्यकर्ते विकास कारभारी, अँड. मनोज सुरोशे व त्यांचे सहकारी, राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष शेलार, सरचिटणीस तथा सामाजिक कार्यकर्ते राम सुरोशे, बालकलाकार हिंमाशू कांबळे आदींनी कु. गौरी पाटील हिचे अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment

वी नीड यू सोसायटीचे २०२४चे शिक्षण, समाज व कार्यव्रती पुरस्कार जाहीर !!

वी नीड यू सोसायटीचे २०२४चे शिक्षण, समाज व कार्यव्रती पुरस्कार जाहीर !! ठाणे, प्रतिनिधी : वी नीड यू सोसायटी संस्थेतर्फे समाजात ‘व...