Tuesday, 7 September 2021

कल्याण डेपोतील चालक, वाहक यांना मार्गदर्शक सुचना ! 'आगार व्यवस्थापक विजय गायकवाड यांच्याकडून काटेकोर पालन करण्याचे आवाहन'

कल्याण डेपोतील चालक, वाहक यांना मार्गदर्शक सुचना ! 'आगार व्यवस्थापक विजय गायकवाड यांच्याकडून काटेकोर पालन करण्याचे आवाहन'


कल्याण, प्रतिनिधी : गेले दिड वर्ष कोरोनाचे संकट, पहिली लाट, दुसरी लाट यातून आपण सावरत असताना परत जगभरात आलेली तिसरी लाट, तसेच राज्य सरकारकडून स्वतः जबाबदारी ओळखून 'मी जबाबदार' वागण्याचे आवाहन.
अशातच गणपती सण तोंडावर आला असून गेल्या वर्षी कोरोना संकटामुळे साजरा न करता आलेला गणोशोत्सव कोकणी बांधव या वर्षी अतिशय जोमाने व भक्तिभावाने साजरा करण्याच्या तयारीत आहेत.


पण अजूनही न संपलेले कोरोनाचे संकट; तिसरी लाट येण्याची शक्यता यामुळे गणोशोत्सव काळात गर्दी होण्याची शक्यता सरकारकडून वारंवार करण्यात येणारे आवाहन. अशावेळेस कोकणवासीयांना कोकणात जाण्यासाठी एसटी एक प्रभावी माध्यम आहे. हजारो कोकणवासीय एसटीने आपल्या गावी जाणार आहेत त्यांच्या सोईकरता अनेक जादा गाड्या कोकणवासीयांना महामंडळाकडून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

कल्याण आगारातून सुध्दा जादा गाड्या कोकणात जाण्यायेण्यासाठी सोडणार आहेत. अशा वेळी संभाव्य तिसरी लाट, कोरोनाचे न संपलेले संकट म्हणून कल्याण डेपोचे आगार व्यवस्थापक श्री. विजय गायकवाड यांनी आपल्या डेपोतील कर्मचाऱ्यांना (वाहक, चालक) मार्गदर्शक सूचना जारी करत त्यांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. आगार व्यवस्थापक विजय गायकवाड यांनी संपूर्ण कोरोना काळात अतिशय जोखीमने काम करीत एक आदर्श निर्माण केला या वेळी राज्य सरकारकडून जारी केलेल्या सूचनांचे काटेकोर पालन केले. त्यांनी केलेल्या कामाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात आले तर अनेक सामाजिक संस्थांनी त्याना गौरविले आहे.

No comments:

Post a Comment

१२ जानेवारी रोजी कुणबी समाजोन्नती संघ चिपळूण शाखेच्या वतीने युवकांना शेतीविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन !

१२ जानेवारी रोजी कुणबी समाजोन्नती संघ चिपळूण शाखेच्या वतीने युवकांना शेतीविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन ! प्रतिनिधी  - निलेश को...