मुंबई - विरार येथे भल्या पहाटे मंदिरात जाताना बिल्डरचा खून.!!
भिवंडी, दिं,7, अरुण पाटील (कोपर) :
सोमवारी पहाटे श्रावण सोमवार निमित्त मंदिरात जात असताना विरारमधील एका बिल्डरची
दबा धरून बसलेल्या काही मारेकऱ्यांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रानं हल्ला केला आहे. या घटनेत संबंधित बिल्डरचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निशांत कदम असं हत्या झालेल्या 31 वर्षीय बिल्डरचं नाव असून ते चाळ बिल्डर आहेत. ते विरार पूर्वेतील सहकार नगरमध्ये वास्तव्याला असून त्यांची एन के एन्टरप्राइजेस नावाची बांधकाम कंपनी आहे. मृत कदम हे दर सोमवारी पहाटे शंकराच्या मंदिरात पूजा करण्यासाठी जात असत. आरोपींना याची माहिती होती. दरम्यान काल सोमवारी पहाटे अडीचच्या सुमारास कदम शंकराच्या मंदिरात जाण्यासाठी आपल्या दुचाकीनं निघाले होते.
दरम्यान गांधी चौक परिसरात काही आरोपी मृत कदम यांची वाट पाहात दबा धरून बसले होते. निशांत कदम गांधी चौक परिसरात पोहोचताच दबा धरुन बसलेल्या आरोपींनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. हा हल्ला इतका भयंकर होता की, चाळ बिल्डर निशांत कदम जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडले. या दुर्दैवी हल्ल्यात कदम यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
या घटनेचा माहिती मिळताच विरार पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी पोलिसांनी काही अज्ञात मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू केला आहे. मृत निशांत कदम यांनी विरार परिसरात पन्नासहून अधिक चाळी आणि इमारती बांधल्या आहेत. परिसरातील अन्य काही बिल्डरांशी त्यांचे व्यावसायिक वाद होते. तसेच सहकार नगर येथील एका जागेवरून कदम यांचे काही जणांशी वाद असल्याची माहिती मृत बिल्डर कदम यांच्या भावाने पोलिसांना दिली आहे. या घटनेचा पुढील तपास विरार पोलीस करत आहेत.
No comments:
Post a Comment