Tuesday, 7 September 2021

कल्याण पंचायत समितीचे उपसभापती पद बाद, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचा निर्णय !!

कल्याण पंचायत समितीचे उपसभापती पद बाद, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचा निर्णय !


कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण पंचायत समितीचे उपसभापती किरन ठोंबरे यांचे पद ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी बाद केले असून पक्षाधेश पाळला नसल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे जिल्हाधिका-यांनी निर्णयात म्हटलं आहे. त्यामुळे आता हे पद किती काळ रिक्त राहते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


कल्याण पंचायत समितीमध्ये शिवसेना ४,भाजपा ५ आणि राष्ट्रवादी काँग्रेस ३ असे पक्षीय बलाबल आहे, शिवसेना भाजपाची पांरपारीक युती पाहता कल्याण पंचायत समिती वर अपेक्षेप्रमाणे भाजपा शिवसेनेची सत्ता येत होती, परंतु स्थानिक पातळीवर असें काय राजकारण झाले की कोण कधी कोणाबरोबर जाऊन सत्तेच्या खुर्चीवर बसतोय हे सांगता येत नव्हते. यातूनच भाजपा राष्ट्रवादी, शिवसेना राष्ट्रवादी असे सत्तेचे गणित मांडले गेले. पण बहुतांश वेळी शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यात भाजपाला यश आले. पण २०२० मध्ये सभापती व उपसभापती दोन्ही पदे शिवसेनेच्या ताब्यात आली. शिवसेनेचे रमेश भाऊ बांगर हे उपसभापती झाले. मात्र यावेळी उपसभापती पद पहिल्यादां खोणी नागाव गणाला देण्यात येणार असे ठरले होते .असे कारण पुढे करुन मोठा' राडा'पंचायत समिती मध्ये झाला होता.परंतु पक्षाधेश आपल्याच होता असे रमेश बांगर यांचे म्हणणे होते.५ जुलै २०२० ते १५ मे २०२१पर्यंत ते उपसभापती पदावर कार्यरत होते. मात्र सदस्य किरण ठोंबरे यांनी १० सदस्यांंच्या स्वाक्षऱ्या घेऊन बांगर यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला. व भाजपा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने उपसभापती पदी विराजमान झाले. परंतु या विरोधात रमेश बांगर यांनी महाराष्ट्र स्थानिय प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम १९८६ चे कलम ३,७ व महाराष्ट्र स्थानिय प्राधिकरण सदस्यांची अनर्हता नियम१९८७चे कलम ३ अन्वये विवाद अर्ज जिल्ह्यधिकारी ठाणे यांचेकडे दाखल केला.

या प्रकरणातील पस दावा क्रमांक १/२०२१ जिल्हाधिकारी ठाणे यांचे न्यायालयात चालविण्यात येवून अंतिम निर्णय नुकताच देण्यात आला..

यामध्ये अपिलार्थी रमेश भाऊ बांगर यांचा अर्ज मान्य करण्यात आला .तर विरुद्ध किरण चंदू ठोंबरे यांनी पक्षाधेश मानला नसल्यामुळे त्यांची महाराष्ट्र स्थानिय प्राधिकरण सदस्यता बाद ठरविण्यात येत आहे.

अधिनियम १९८६ चे कलम ३,७ व त्या अंतर्गत नियम ६ अन्ववये ही  कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता कल्याण पंचायत समितीचे उपसभापती पद हे रिक्त झाले आहे. पुढील काही महिने तरी ते रिक्त राहणार आहे.

तसे पाहिले तर कल्याण पंचायत समिती वर आतापर्यंत ३४ सभापती तर २४ उपसभापती यांचा कार्यकाळ झाला आहे. यामध्ये १९९०/९२ मध्ये प्रशासन, २००२ ते २००५ न्यायप्रविष्ठ तर पुन्हा २०१४ ते २०१८ परत प्रशासन अशी परिस्थिती उपसभापती पदाची होती. त्यांचीच पुनरावृत्ती आता होते की काय?असे वाटते .कारण आता एक सदस्य हा सेनेचाच बाद झाला आहे. त्यामुळे भाजप ५, शिवसेना ३, आणि राष्ट्रवादी काँग्रेस ३ असे संख्या बळ झाले आहे. जो निवडणूक आयोगाचा निर्णय येत नाही तोपर्यंत हे पद रिक्त राहणार आहे.

प्रतिक्रिया हा निर्णय आयोगाकडे पाठविण्यात येणार आहे, आयोगाकडून पुढील आदेश आल्यानंतर च काय तो निर्णय घेतला जाईल,"- राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी, ठाणे.

No comments:

Post a Comment

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला पश्चिम, मुंबई- 70 या रात्र विद्यालयात शाळेय समिती व शाळा व्यवस्थापन विकास समिती, सखी सावित्री, विशाखा समितीची सभा मोठ्या उत्साहात पार पाडली!!!

मुंबई प्रतिनिधी ता.12, आज शनिवार दिनांक 11 जानेवारी 2025 रोजी पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ, भिवंडी संस्था संचालित संत ज्...