ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या कडून पत्रकार संजय कांबळे यांचे अभिनंदन !!
कल्याण, (प्रतिनिधी) : शांत, संयमी, गुणवान, कर्तृत्ववान आणि सर्जनशील असे व्यक्ती महत्त्व लाभलेले ठाणे जिल्हाचे जिल्हाधिकारी राजेशजी नार्वेकर यांनी पत्रकार संजय कांबळे यांचे परिणाम कारक बातमीदारी बद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ने केलेल्या जाहीर सत्कारा बद्दल अभिनंदन केले आहे.
कल्याण तालुक्यात गेली तीन दशकाहून अधिक काळ पत्रकारिता करणारे पत्रकार संजय कांबळे यांनी अगदी सुरुवातीपासून तालुक्यातील अनेक प्रश्न, अडचणी, समस्या, दैनिक, गावकरी, पुण्यनगरी, सकाळ, लोकमत, महाराष्ट्र जनमुद्रा, दैनिक सागर, बातमीदार, महानगरी टाईम्स, दैनिक अग्रलेख, बातमीदार माझा, आदी वृत्तपत्रांतून मांडली आहे .त्यांनी नुकतीच कल्याण आणि शहापूर या दोन तालुक्या दरम्यानच्या रस्त्याची बिकट अवस्था विविध दैनिकातून सचित्र प्रसिद्ध केली होती.
गेली कित्येक वर्षे या रस्त्याकडे कोणीही लक्ष दिले नव्हते. परंतु संजय कांबळे यांच्या बातमीच्या दणक्याने अखेर या रस्त्याचे काम प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून सुरू झाले आहे. त्यामुळे आमचा कित्येक वर्षांपासून रखडलेला प्रश्न सुटला या भावनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सेवादल यांनी पत्रकार संजय कांबळे यांचा जाहीर सत्कार केला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष संतोष शेलार, तालुका अध्यक्ष, संजय मोरे, पक्षाचे युवा सरचिटणीस महेश दळवी, घोटसई गावचे सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर सुरोशे आदी उपस्थित होते. ही बातमी प्रसिद्ध होताच ठाणे जिल्हाधिकारी राजेश जी नार्वेकर, यांनी खास मँसेज पाठवून पत्रकार संजय कांबळे यांचे अभिनंदन केले.
याशिवाय औरंगाबाद महानगरपालिकेचे आयुक्त ब. भी. नेमाने, ठाणे जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे डेप्युटी सीईओ श्रीमती छायादेवी सिसोदिया, उपमुख्यकार्यकारी चंद्रकांत पवार, आखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे महेश देशपांडे, कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, अशोक भवारी, सर्व विस्तार अधिकारी व कर्मचारी, तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, जीवनदिप महाविद्यालयाचे अध्यक्ष रवींद्र घोंडविदे, सरस्वती विद्यालयाचे प्राचार्य अमृतकर सर, प्रसिद्ध वकील एँड मनोज सुरोशे, एँड सुनील गायकर,एँड कामेश पाटील, एँड अक्षय कुंभार, एड जाधव,चित्रपट निर्माते कैलास मदने, दिग्दर्शक अकुंंर शिंदे, अभिनेते जयवंत वाडकर, संजय जाधव, आदींनी पत्रकार संजय कांबळे यांचे अभिनंदन केले आहे.
No comments:
Post a Comment