Friday, 1 October 2021

उपअभियंता प्रशांतकुमार मानकर यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते लोक सेवक गौरव पुरस्कार प्रदान !! "मा. केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांची विशेष उपस्थिती"

उपअभियंता प्रशांतकुमार मानकर यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते लोक सेवक गौरव पुरस्कार प्रदान !!

"मा. केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांची विशेष उपस्थिती"


मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभाग कल्याण येथे कार्यरत असलेले अभियंता प्रशांत कुमार तुकाराम मानकर यांना राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या हस्ते उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल लोक सेवक गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले उपस्थित होते.


सार्वजनिक बांधकाम विभागातील उपअभियंता प्रशांतकुमार तुकाराम मानकर यांची कर्तव्यदक्ष, कार्यकुशल अधिकारी म्हणून ओळख आहे. कर्तव्यात ते कधीही कसूर करत नाहीत .अनेक महत्त्वपूर्ण विषयावर त्यांचे सहकाऱ्यांना मार्गदर्शन असते सर्व सहकाऱ्यांबरोबर अतिशय प्रेमळ संबंध प्रस्थापित करून ते काम करून घेण्याची त्यांची विशेष हातोटी आहे. 


मुळचे नागपूर शहरातील असलेले प्रशांतकुमार मानकर यांनी सुरवातीपासूनच अतिशय मेहनती कष्टाळू अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते. गरज असेल तिथे वेळप्रसंगी सोळा सोळा तास काम केले आहे. नेहमीच पदापेक्षा जास्त आपल्या कामाला महत्त्व दिले. 

शासनाचा सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे लोकांच्या हिताची कामे या विभागांमधून होतात जनतेशी या कामातून जवळून ओळख होते यातून आपणास लोकांची सेवा करण्याची संधी मिळते याची जाणीव ठेवली असे मानकर नेहमी आपल्या सहकाऱ्यांना सांगत असतात. अत्यंत शांत व मनमिळाऊ स्वभावाचे कर्तव्यदक्ष अधिकारी ही त्यांची ओळख बनली. हे करत असताना त्यांनी काही गरजवंत मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी, तसेच ओळखीतील असो किंवा नसो कोणी अडचणीत असेल त्याला शक्य होईल ती मदत करणे. प्रत्येकाची अडचण लक्षात घेऊन ती दूर करणे. मदत करणे लॉक डाऊन च्या काळात त्यांनी अनेक सामाजिक संस्थांना भरभरून मदत केली आहे. लोक डाऊन च्या काळात अनेक अधिकारी हे घरात गप्प बसले असताना मानकर मात्र दिवस-रात्र जनतेला काही ना काही मदत करण्यात व्यस्त होते.


अशा कर्तृत्ववान अधिकारी प्रशांतकुमार तुकाराम मानकर यांचा सन्मान ठाणे सा. बा. मंडळ कार्यालयात १५ सप्टेंबर रोजी सचिव सा. बा. महाराष्ट्र शासन मा. अनिलकुमार गायकवाड व मुख्य अभियंता सा. बा. प्रादेशिक विभाग कोकण मा. राजभोज साहेब यांच्या हस्ते करण्यात आले आला होता. प्रशांतकुमार मानकर यांच्या कामाची उचित दखल घेऊन त्यांना दि. ३० सप्टेंबर रोजी युनायटेड बुधिस्ट अँड आंबेडकर राईट फाउंडेशन यांनी आयोजित केलेला लोकसेवक गौरव राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते मा. केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांच्या उपस्थितीत राजभवन येथे मानकर यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

No comments:

Post a Comment

श्रीअप्पासाहेब निकत (IFS Officer ) यांना वन सेवेतील वन संरक्षणाच्या प्रभावी व सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाने राज्यस्तरीय सुवर्ण पदक जाहीर !

श्रीअप्पासाहेब निकत (IFS Officer ) यांना वन सेवेतील वन संरक्षणाच्या प्रभावी व सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाने राज्यस्तरीय सुवर्ण...