Saturday, 2 October 2021

धनंजय आंबेरकर लिखित "WARकरी तुकाराम" पुस्तकाचे प्रकाशन !!

धनंजय आंबेरकर लिखित "WARकरी तुकाराम" पुस्तकाचे प्रकाशन !!


मुंबई, (केतन भोज) : २४ सेप्टेंबर शाक्त राज्याभिषेकाच्या निमित्ताने धनंजय आंबेरकर यांचे "WAR करी तुकाराम" हे पुस्तक रायगड किल्ल्यावर प्रकाशित झाले. संभाजी ब्रिगेड चे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष सुधीर दादा भोसले यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. संत तुकाराम म्हणजे येथील अनिष्ट रूढी परंपरे विरुद्ध बंड करणारे विद्रोही संत होते. मात्र तुकारामांच चित्र टाळकुटया, अव्यवहारी असल्यासारखं गेले अनेक वर्ष उभं केल गेल, मात्र तुकाराम हे शब्दार्थप्रभू असून व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारणारे होते. त्यांचा संस्कृतिक लढा सर्वसामान्यां पर्यंत पोहोचवन्यासाठी ह्या पुस्तकाची निर्मिती केली अस धनंजय आंबेरकर म्हणाले. डॉ.बालाजी जाधव यांच्या पंचफुला प्रकाशनातर्फे ह्या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे, तर मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ति बी.जी.कोळसे पाटिल यांनी पुस्तकासाठी ब्लर्ब लिहिलेला असून धनंजय आंबेरकर यांच्या पुढील लिखाणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment

श्रीअप्पासाहेब निकत (IFS Officer ) यांना वन सेवेतील वन संरक्षणाच्या प्रभावी व सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाने राज्यस्तरीय सुवर्ण पदक जाहीर !

श्रीअप्पासाहेब निकत (IFS Officer ) यांना वन सेवेतील वन संरक्षणाच्या प्रभावी व सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाने राज्यस्तरीय सुवर्ण...