शेतकरी शेतमजुरांना तीन महिन्यांपासून पेन्शन नाही निराधार यांचे हाल !!
"शेतमजूर युनियन तर्फे ८ऑक्टोबरला आंदोलनाचा इशारा"
चोपडा.. महाराष्ट्र राज्य व केंद्र सरकार तर्फे भूमिहीन अल्पभूधारक विधवा वयोवृद्ध तसेच दिव्यांग व्यक्ती यांचेसाठी दरमहा एक हजार रुपये प्रमाणे मानधन दिले जाते. त्यासाठी श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी निराधार योजना आदी योजना राबविल्या जाते. अत्यंत वयोवृद्ध निराधार व्यक्तींना जीवन जगण्यासाठी ही रक्कम म्हणजे मोठा आधार आहे आणि ती दरमहा नियमित मिळाला पाहिजे परंतु गेल्या तीन महिन्यापासून या रकमा न मिळाल्यामुळे गोरगरीब विधवा महिला यांची आर्थिक कुचंबणा होत आहे. महाराष्ट्र सरकारने आर्थिक नियोजन करताना या लोकांची मानधने र कमा प्राधान्यक्रमाने दिल्या पाहिजेत तरी या रकमा ताबडतोब अदा करावीत अशी मागणी लालबावटा शेतमजूर युनियन तर्फे सरकारला करण्यात आली आहे तसेच पेरालेसिस व दुर्धर आजार झालेले लोकांना खाजगी व सरकारी उपचाराची कागदपत्र पाहून जिल्हा उप रुग्णालय मार्फत मानधन मिळणे साठी आवश्यक तो वैद्यकीय दाखला मिळावा यासंदर्भात व थकीत पेन्शन मानधन न दिल्यास आठ ऑक्टोबर रोजी चोपडा तहसीलदार कार्यालयावर धरणे आंदोलन केले जाईल असा इशारा संघटनेतर्फे कॉम्रेड गोरख वानखेडे, अमृत महाजन, शांताराम पाटील, हिराबाई सोनवणे, वासुदेव कोळी ,अरमान तडवी, सुमन बाई माळी, युवराज साळुंके, रेखा साळुंके, आदींनी दिला आहे.
No comments:
Post a Comment