Saturday, 2 October 2021

सन्मान महाराष्ट्राचा! गौरव क्रीडा क्षेत्राचा !! "महाराष्ट्रातील बदलते क्रीडा धोरण ! चर्चासत्र दिग्गज क्रीडापटूंची उपस्थिती" *4 ऑक्टोबर रोजी कल्याण येथे रंगणार सोहळा*

सन्मान महाराष्ट्राचा ! गौरव क्रीडा क्षेत्राचा !! "महाराष्ट्रातील बदलते क्रीडा धोरण ! चर्चासत्र दिग्गज क्रीडापटूंची उपस्थिती"

*4 ऑक्टोबर रोजी कल्याण येथे रंगणार सोहळा*


कल्याण :- महाराष्ट्र ऑलिंपिक संघटना यांची नुकतीच पुणे येथे पंचवार्षिक निवडणूक संपन्न झाली व नामदेव शिरगावकर यांची महासचिव पदी निवड झाल्याबद्दल 
ठाणे जिल्ह्यातील सर्व एकविध क्रीडा संघटनांच्या माध्यमातून महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा यथोचित सन्मान सोमवार दिनांक ४ ऑक्टोबर २०२१ रोजी दुपारी २:०० वाजता, के. सी गांधी हायस्कूल, जोकर टॉकीज जवळ, बैल बाजार, कल्याण (पश्चिम) येथे करण्याचे योजले आहे. 

तसेच या निमित्ताने *महाराष्ट्रातील बदलते क्रीडा धोरण !* या विषयावर उद्बोधक चर्चासत्र संपन्न होणार आहे. हा कार्यक्रम ऑफलाईन स्वरुपात संपन्न होणार असून या सोहळ्यासाठी मा. उपसभापती व आमदार श्री नानाभाऊ पटोले, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार विश्वनाथ भोईर, आमदार गणपत गायकवाड,  आमदार  राजू पाटील, मा. आमदार नरेंद्र पवार, KDMC मा. महापौर श्रीमती राणे मॅडम, क्रीडा संघटनांचे संजय पाटील, ब्रिज दत्त, हे उपस्थित राहणार आहेत असे
ठाणे जिल्हा एकविध क्रीडा स्वागत समिती अध्यक्ष
संदिप ओंबासे यांनी बोलताना सागितले. हा कार्यक्रम यशस्वी  करण्यासाठी समितीचे कार्याध्यक्ष "प्रा. उदय नाईक, संयोजक अंकुर आहेर, कार्यवाह प्रा.लक्ष्मण इंगळे व सहकार्यवाह संतोष पाठक" हे परिश्रम घेत आहेत..

- अविनाश ओंबासे
9820991450

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !!

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !! ...