Tuesday, 26 October 2021

कोंकण प्रतिष्ठान टिटवाळा अध्यक्ष प्रदिप घाणेकर यांचा वाढदिवस निराधार, अनाथ मुलांच्या समवेत साजरा !!

कोंकण प्रतिष्ठान टिटवाळा अध्यक्ष प्रदिप घाणेकर यांचा वाढदिवस निराधार, अनाथ मुलांच्या समवेत साजरा !!


मुंबई, बातमीदार : 

रविवार दि. २४ ऑक्टोबर २०२१ रोजी, राजे श्री शिवछत्रपती कोंकण प्रतिष्ठान टिटवाळा, तालुका कल्याण या संस्थेचे 'अध्यक्ष प्रदिपजी घाणेकर' यांचा वाढदिवस हा अनोख्या पद्धतीने सामाजिक उपक्रम म्हणजेच "अंकुर बाल विकास केंद्र व अनाथ आश्रम" टिटवाळा येथील निराधार लेकरांच्या समवेत साजरा करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवून या चार भिंतीच्या बाहेरील जीवनाचा, जगाचा आनंद देऊन "जरी होता नाही आलं अनाथांची माय.. तरी छोटासा प्रयत्न करू या होऊ मायेची दुधावरील साय" या उक्तीप्रमाणे वाढदिवस साजरा केला. 


      गेली कित्येक वर्ष कोंकण प्रतिष्ठान  ही संस्था टिटवाळा- कल्याण मध्ये नेहमीच आगळ्या वेगळ्या संकल्पना, उपक्रम राबविले आहेत. यामध्ये वाढदिवसाचे सुवर्णयोग साधून नागरिकांना पाणीपुरवठा जलवाहिनी उदघाटन, रक्तदान शिबीर, कापडी पिशिवी वाटप व आज हा वाढदिवस निराधाराला आधार देण्याचे कार्य करून एक अनोखा उपक्रम व बदलत्या युगासोबत सामाजिक  परिवर्तन या विचारसरणीचा आदर्श सर्वांसमोर ठेवला.या उपक्रमाला सामाजिक विचार परिवर्तन चळवळीत खऱ्या अर्थाने सहभाग घेतला तो म्हणजे ज्यांचा वाढदिवस एक दिवस आधी होता अशा संस्थेच्या रणरागिणी सौ. प्रांजलताई प्रभात घाणेकर व संस्थेचे संपर्क प्रमुख राजूजी झोरे यांचा वाढदिवस दुसऱ्या दिवशी होता पण दोघांनीही वाढदिवस हा ह्या निराधार लेकरांसोबत साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि या उपक्रमाचा आनंद हा वाढला. 


      या उपक्रमाची सुरवात या तिघांनी या चिमुकल्या लेकरांसोबत केक कापून केली त्यानंतर बालशिवव्याख्याता रुद्र रविंद्र पालकर यांनी शिवव्याख्यानातून महापुरुषांचे विचार दिले. नंतर सर्व लेकरांसमवेत सामूहिक मनोरंजनाचे विविध खेळ, स्पर्धा घेऊन त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद फुलवला की तहानभूक हरपून ती लेकरं खेळात मग्न झाली हाच त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून सर्वांच्या डोळे आनंदाने भरून आले. खेळ व स्पर्धेचे बक्षिस देण्यात आले. वाढदिवस मूर्ती प्रदिपजी घाणेकर, राजूजी झोरे, प्रांजलताई घाणेकर यांना वाढदिवस भेट वस्तू मनभावे कलाविष्कार या संस्थेच्या वतीने लेकरांच्या शुभहस्ते देण्यात आले. नंतर या निराधार लेकरांना कोंकण प्रतिष्ठानच्या वतीने ऊबदार ब्लॅंकेट, टिफिन बॉक्स, सुनीलजी भुवड यांच्या वतीने वही पेन पेन्सिल, संदिपजी बाने यांनी पेन्सिल सेट, प्रफुल्लजी धुळप यांनी खाऊ वाटप केला. त्यानंतर अध्यक्ष प्रदिपजी घाणेकर यांनी स्वतः या लेकरांना भोजन करताना मायेचा घास भरवून एक वेगळाच आनंद होऊन साजरा केलेला वाढदिवस खऱ्या अर्थाने सार्थकी लागला. ह्या उपक्रमाला कोंकण प्रतिष्ठानची, सदस्य, पदाधिकारी, महिला मंडळ, विद्यार्थी, लहान बाळ यांची अभूतपूर्व उपस्थिती लाभली व खऱ्या अर्थाने संस्थेच्या एकजुटीची ताकद दिसली असा उपक्रम घेणारी संस्था ही पहिलीच असावी कारण या सामाजिक उपक्रमाची व वाढदिवसाची चर्चा सर्वत्र होत असून संस्थेचे गुणगाणं तोंड भरून कौतुक होत आहे. शिवसेना कल्याण ग्रामीण सचिव नामदेवजी बुटेरे, प्रसादजी फर्डे, विठ्ठलजी भांबळे,  जनसेवक विजयभाऊ देशेकर, योगेशजी गायकवाड, संतोषदादा देशेकर, दिलीपजी राठोड, नितीनजी सिंग, कुणबी युवाध्यक्ष मंगेशजी मांडवकर,  प्रविणजी शिबे, दिनेशजी मांडवकर, शैलेशजी शिगवण, संतोषजी दोडकडे, संतोषजी घाणेकर, केशवजी व्यापारी, प्रविणजी मोहने आदी अनेक मान्यवर मंडळी यांनी या उपक्रमाला सदिच्छा भेट देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 


     हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेच्या सर्वच शिलेदार, उपाध्यक्ष राजेंद्रजी चव्हाण, योगेशजी नाचरे, सहसचिव निलेशजी जाधव, खजिनदार गणेशजी वागजे, कायदेविषयक सल्लागार जीवनजी हिवराळे सर, संपर्क प्रमुख सतीशजी गायकर, रमेशजी जाधव, लवजी कदम, ओमकारजी चिनकटे, नरेशजी सकपाळ, गणेशजी निकम, प्रदिपजी शिवगण, महेशजी चव्हाण, दिपकजी लोंढे, रविंद्रजी पालकर, अरविंदजी शिगवण, राजेशजी शिगम, रमेशजी करबेले, सचिनजी पोवार, मनोजजी जाबरे, विकासजी गुरव, विलासजी मिशाळ, शशिकांतजी मालप व जय महाराष्ट्र क्रिकेट संघ, वैद्यकीय समिती प्रमुख तसेच  महिला मंडळ यांच्या मेहनतीने यशस्वी झाला. कार्यक्रमाचे रंगतदार सूत्रसंचालन मुलांचे मनोरंजन सरचिटणीस मनीषजी लोंढे यांनी केले.

No comments:

Post a Comment

कोंढरीपाडा–कासवलेपाडा मुख्य रस्त्यावर लाईटचे लोकार्पण !

कोंढरीपाडा–कासवलेपाडा मुख्य रस्त्यावर लाईटचे लोकार्पण ! ** ३५ वर्षांचा अंधार संपला ; ३५ वर्षानंतर प्रकाश दिव्याची सोय. उरण दि १२...