शेतकऱ्यांना वेठीस धरणा-या तलाठ्यांचा संप अखेर अप्पर मुख्य सचिवांच्या 'बोळवणानंतर' स्थगित?
कल्याण, (संजय कांबळे) : कोरोनाच्या संकटामुळे बेजार झालेल्या बळीराजाचे ,पूर, अतिवृष्टी, चक्री वादळ या नैसर्गिक आपत्ती ने पुरते कंबरडे मोडले आहे. अशा वेळी त्यांना शासनाच्या मदतीची गरज असतानाच नेकम्या अशा वेळी राज्यातील मंडल अधिकारी व तलाठी यांनी संप पुकारला व कोणत्याही लेखी आश्वासनाशिवाय राज्याचे अप्पर सचिवांच्या जुजबी बोळवणानंतर हा संप स्थगित करण्यात आला. त्यामुळे यातून काय साध्य झाले. अशी चर्चा तलाठी व महसूल कर्मचाऱ्यामध्ये ऐकायला मिळत आहे.
महसूल विभागाचे कान व डोळे म्हणजे तलाठी होय, त्यामुळे यांंना अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. अगदी ऐतिहासिक काळापासून 'आण्णासाहेब' यांना भलताच मान होता व आजही आहे, काळानुरूप तो बदलत चालला आहे.
राज्यात २ हजार १०६ मंडळ अधिकारी व १२ हजार ६३६ तलाठी सजे आहेत, राज्यातील तलाठी, पटवारी, मंडळ अधिकारी हे महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करणे, महसूल उत्पन्नात वाढ करुन राज्याचा विकासाचा मार्ग प्रशस्त करणे, शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम हे करत असतात. महसूल लेखे जोखे संगणकीय करण करणे, ७/१२ ई फेरफार, ई चावडी, या विविध योजना तलाठी, पटवारी,मंडळ अधिकारी, यांनी स्वखर्चाने रात्रदिवस काम करून महत्त्वकांक्षी प्रकल्प पुर्णत्वास नेले आहे.
दरम्यान महाराष्ट्र राज्य तलाठी संघ,पटवारी,मंडळ अधिकारी समन्वय महासंघाचे अध्यक्ष श्री डुब्बल यांनी सध्या राज्यात नैसर्गिक आपत्ती, ई पिक पाहणी व मोफत ७/१२ व ८ अ खातेदारांना वितरण या संदर्भात मंगळवारी तलाठी, पटवारी, मंडळ अधिकारी यांना मार्गदर्शन पर राज्य कार्यकारिणी या व्हाट्सअप ग्रुपवर मँसेज पाठवला होता. तो अन्य ग्रुप द्वारे रामदास जगताप, आयुक्त, राज्य समन्वयक जमावबंदी, यांना मिळाला. यावर त्यांनी या ग्रुपवरच 'मुर्खासारखे मेसेज पाठवू नका'असा मेसेज पाठवला, बस्स!
इकडे लगेचच महाराष्ट्र राज्य तलाठी संघ,पटवारी, आणि मंडल अधिकारी यांचा" इगो"हर्ट झाला, या मेसेज मुळे राज्यातील तलाठी, पटवारी, मंडळ अधिकारी, निवासी नायबतहसिलदार, यांचा अपमान झाल्याची भावना यांच्या मध्ये निर्माण झाली आणि जगताप यांची बदली करण्याची मागणी होऊ लागली, तसे संघटनेने पत्रच महसूलमंत्री,बाळासाहेब थोरात, अप्पर सचिव महसूल डाॅ. नितीन कर्रीर यांना दिले.
७/८ आँक्टोबरला काळ्या फिती लाऊन, कामकाज, ११ ला निदर्शने, तर १२ आँक्टोबरला डी एस जी जमा करणे, मंत्री, खासदार, आमदार यांना निवेदन देणे व १३ आँक्टोबर पासुन संपूर्ण कामकाजावर बहिष्कार ,असे संपाचे नियोजन केले होते. त्यानुसार गेली १२ दिवस संप सुरू होता, या काळात सर्व तलाठी, मंडळ अधिकारी, कार्यालये बंद होती. या संपाबाबत महसूल विभागाच्या वरीष्ठांनी चर्चेसाठी कार्यकारिणी सदस्यांना बोलावले. परंतु चर्चा फिस्कटली.
दरम्यान या वेळी राज्यातील बळीराजावर पुर, अतिवृष्टी, चक्रीवादळे यांचे मोठे संकट ओढवले होते, त्यांचे नुकसान भरपाई चे पंचनामे करून जगाच्या पोशिंद्याला ताबडतोब मदत मिळणे अपेक्षित होते. मात्र नेमक्या अशा वेळी तलाठी संपावर गेले होते. त्यामुळे त्यांच्या विरोधात शेतकऱ्यांसह ,नागरिकांमध्ये कमालीचा संताप पसरला होता. अनेक शेतकरी, नागरिक, कार्यकर्ते हे तलाठी कार्यालयात जात ,मात्र ते बंद असल्याने तलाठ्यांना शिव्याशाप देऊन परत येत, असे चित्र सर्वत्र दिसत होते.
तसे पाहिले तर ज्या कारणांसाठी संप पुकारला होता, तशी कारणे दररोज तलाठी, पटवारी, मंडळ अधिकारी, यांच्या बाबतीत घडतात, तलाठ्यांना शिव्याशाप, मारहाण, जमीन मोजणीच्या वेळी मंडळ अधिकारी, तहसीलदार यांच्या वर हल्ले, काही कामात चुका झाल्या तर वरीष्ठांच्या अश्लील शिव्या, अपमानास्पद वागणूक, असे प्रकार रोजच घडतात, तेव्हा तर मग रोजच संप, अंदोलन, करावे लागेल याचा अर्थ राज्य अध्यक्ष डुब्बल यांचा अपमान समर्थणीय आहे असे मुळीच नाही पण काळ, वेळ प्रंसग, याचा विचार करून संप करायला हवा, असे शेतकऱ्यांचे म्हणने आहे. आणि तसेही इतके दिवस संप करून काय हाती लागले? तर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आणि अप्पर सचिव महसूल नितीन करीर यांच्याशी झालेल्या जुजबी चर्चेत कोणत्याही ठोस, लेखी आश्वासना शिवाय केवळ करतो, बघतो, अशा तात्पुरत्या बोळवण वर काल सांयकाळी संप स्थगित करण्यात आला. त्यामुळे या संपाविषयी महसूल विभाग, व कर्मचाऱ्यांमध्ये उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.
प्रतिक्रिया- अप्पर सचिव यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर संप स्थगित करण्यात आला. कोणतेही लेखी आश्वासन दिले नाही.'- ज्ञानदेव डुब्बल, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य तलाठी संघ.
-आम्ही कार्यक्षेत्रात काम करताना आम्हाला रोज अपमानाला सामोरं जावं लागतं, कधी कधी तर जीवघेणे हल्ले ही होतात- एक तलाठी.



No comments:
Post a Comment