Tuesday, 12 October 2021

डॉ. संजय सोनावणे यांनी माणगांव येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहाला भेट देऊन कार्यकर्त्यां कडे केली महत्वपूर्ण चर्चा !!

डॉ. संजय सोनावणे यांनी माणगांव येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहाला भेट देऊन कार्यकर्त्यां कडे केली महत्वपूर्ण चर्चा !! 


       बोरघर / माणगांव, ( विश्वास गायकवाड ) : लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, दैनिक रायगड लोकशक्ती चे संपादक, नामवंत उद्योजक डॉ. संजय सोनावणे आणि त्यांचे सहकारी लोकशक्ती संजीवनीचे राष्ट्रीय आपत्ती सचिव खेमराज रावल यांनी नुकतेच रायगड जिल्ह्याच्या माणगांव तालुक्यातील बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा माणगांव आणि विभागीय शाखा यांच्या नेतृत्वाखाली नवनिर्माण केलेल्या माणगांव येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहाला धावती भेट देऊन विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध आणि विश्वरत्न महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना वंदन करून माणगांव तालुका बौद्धजन पंचायत समितीच्या पदाधिकारी यांच्या समवेत या स्मारकाची पाहणी करून त्या संदर्भात कार्यकर्त्यां सोबत सविस्तर चर्चा केली. माणगांव तालुका बौद्धजन पंचायत समिती च्या विद्यमान पदाधिकार्यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. 


     संपूर्ण महाराष्ट्र राज्यासह रायगड जिल्ह्याच्या सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात भरीव कार्य करुन नेहमीच कार्यरत असलेले लोकसंजीवनी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय राजाराम सोनावणे यांनी रायगड जिल्ह्याच्या दौर्यावर असताना माणगांव तालुक्यातील माणगांव तालुका बौद्धजन पंचायत समिती संचालित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहाला भेट देवून महापुरुषांच्या प्रतिमांना विनम्रपणे वंदन करून या स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्याच्या बांधकामा संदर्भात सविस्तर चर्चा केली. सदर चर्चेत या स्मारक सभागृहाच्या दुसऱ्या टप्प्याच्या बांधकामा साठी मी व्यक्तीशः यथायोग्य महत्वपूर्ण असे योगदान देईन असे आश्वासन दिले. 
      या प्रसंगी माणगांव तालुका बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखेचे विद्यमान अध्यक्ष रविंद्रजी मोरे, उपाध्यक्ष विठोबा मोरे, सचिव आर डी साळवी, मुंबई उच्च न्यायालयाचे जेष्ठ विधिज्ञ नरेश जाधव, पत्रकार उत्तम तांबे, प्रशांत गायकवाड, संतोष मोरे, पत्रकार विश्वास गायकवाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

“सिंग्रोबा धनगर—खंडाळा घाटाचा मार्गदर्शक, देशभक्तीचा दीपस्तंभ”.

“सिंग्रोबा धनगर—खंडाळा घाटाचा मार्गदर्शक, देशभक्तीचा दीपस्तंभ”. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला खंडाळा घाट आज आपल्या दैनंदिन प्रवासाच...