Tuesday, 12 October 2021

स्वातंत्र्यवीर सावरकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न मिळावा या मागणीसाठी स्वाक्षरी मोहिम !! 'पाच लाख नागरिकांच्या स्वाक्षरी द्वारे भारत सरकारकडे निवेदन देणार'

स्वातंत्र्यवीर सावरकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न मिळावा या मागणीसाठी स्वाक्षरी मोहिम !!

'पाच लाख नागरिकांच्या स्वाक्षरी द्वारे भारत सरकारकडे निवेदन देणार'


मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) :

          भारत स्वातंत्र व्हावा यासाठी दोन वेळा जन्मठेपेची शिक्षा भोगणारे, भाषाशुद्धी, लिपीशुद्धी चळवळीचे प्रणेते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू करून स्त्री सक्षमीकरण करणाऱ्या शिक्षण सरस्वती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न मिळण्यासाठी गेल्या अनेक दशकापासून मागणी पुढे येत आहे. 


अनेक संस्था, सामाजिक कार्यकर्त्यानी भारत सरकारला निवेदन दिले मात्र केंद्र सरकार कडून अद्यापही या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. स्वातंत्र्य पूर्व काळात ज्यांनी भारत स्वातंत्र्य व्हावा व मुलींना शिक्षण घेता याव यासाठी जीवन चळवळीत घालवणाऱ्या अशा विभूतींना भारतरत्न ही पुरस्कार प्राप्त पदवी असून भारताचा तो गौरव आहे . सामाजिक कार्यकर्ते वैभव आवटे पाटील आणि राजेंद्र पवार यांच्या वतीने घाटकोपर मध्ये पाच लाख लोकांच्या सह्याच्या माध्यमातून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारत सरकारने भारतरत्न द्यावा या मागणीसाठी विभागात स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. पाच लाख नागरिकांच्या स्वाक्षरी द्वारे भारत सरकारकडे निवेदन देण्यात येणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते वैभव आवटे पाटील आणि राजेंद्र पवार यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले.

फोटो : स्वातंत्र्यवीर सावरकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न मिळावा या मागणीसाठी घाटकोपर मध्ये स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली.

No comments:

Post a Comment

“सिंग्रोबा धनगर—खंडाळा घाटाचा मार्गदर्शक, देशभक्तीचा दीपस्तंभ”.

“सिंग्रोबा धनगर—खंडाळा घाटाचा मार्गदर्शक, देशभक्तीचा दीपस्तंभ”. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला खंडाळा घाट आज आपल्या दैनंदिन प्रवासाच...