Friday, 26 November 2021

शहापूर काँग्रेसतर्फे आज कीर्तनातून संविधान जागर !!

शहापूर काँग्रेसतर्फे आज कीर्तनातून संविधान जागर !!


शहापूर, (एस. गुडेकर) :
   देशात लोकशाही अस्तित्वात आल्यानंतर देशातील तमाम बहुजन वर्गाला व गावकुसबाहेरील माणसाला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला त्या संविधानाचे महत्व व राष्ट्रीय एकात्मता टिकविण्यासाठी संविधान दिनानिमित्त काँग्रेसने विविध उपक्रम हाती घेतले असून ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या नेतृत्वाखाली शहापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष महेश धानके यांनी कीर्तनातून संविधान जागर करण्यासाठी शुक्रवार दिनांक 26 नोव्हेंबर 2021 रोजी सायंकाळी 6:30 वाजता खातीवली ठाकूर पाडा येथे कीर्तनाचे आयोजन केले आहे.

काँग्रेसने दिनांक 14 ते 29 नोव्हेंबर पर्यंत जनजागरण अभियान सुरू केले असून ठाणे ग्रामीण जिल्ह्यात या निमित्ताने विविध कार्यक्रम होत आहेत याच अभियान अंतर्गत सामाजिक प्रबोधन करणारे हभप भास्कर महाराज जाधव हे कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता, संविधान जागर आणि वाढती महागाई यावर कीर्तनाच्या माध्यमातून भाष्य करणार आहेत.

या कार्यक्रमास अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप, प्रदेश उपाध्यक्ष सुभाष कानडे, ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरघे, माजी खासदार सुरेश टावरे, प्रदेश सचिव निलेश पेंढारी, राजेश घोलप यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

तरी या कीर्तन सोहळ्यास आवर्जुन उपस्थित रहावे असे आवाहन काँग्रेसचे तालुका अध्यक्ष महेश धानके यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

दुषित गटारात मरण पावलेल्या ऋतिक कुरकुटेच्या वारसांना नुकसान भरपाई द्या. यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय समोर बुधवारी निदर्शने.

दुषित गटारात मरण पावलेल्या  ऋतिक कुरकुटेच्या वारसांना नुकसान भरपाई द्या. यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय समोर बुधवारी निदर्शने. ...