स्वराज्य ग्रुप" तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप !!
कोकण - ( दिपक कारकर ) :
विविध उपक्रम राबवत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कोकण सुपूत्र युवा समाजसेवक वैभव राऊत यांच्या उपरोक्त समूहातर्फे चिपळूण तालुक्यातील जि.प.आदर्श शाळा करंबवणे नं.१ येथे सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.या कार्यक्रमास सरपंच सौ.खळे मॅडम, केंद्रियप्रमुख, थोर सर, शा.व्य. अध्यक्षा सौ. स्मितल सन्नाक, उपाध्यक्षा सौ. कीर्ती जाधव, शा. व्य. सदस्य व माजी सरपंच श्री. शिगवण, ग्रामस्थ श्री.प्रतीक आयरे, सदस्या सौ. समीक्षा सन्नाक, सौ. जान्हवी पवार, सौ. शर्मिला सन्नाक आदी उपस्थित होते. स्वराज्य ग्रुपचे संस्थापक/ अध्यक्ष वैभव राऊत यांचे शाळा व्य. समिती, शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांनी अभिनंदनासह कौतुक केले.
No comments:
Post a Comment