Friday, 19 November 2021

दामोदर नाट्यगृहात कोकणातील जाखडी (शक्ती-तुरा) महा मुकाबल्याला शक्तिवाले शाहीर संदीप मोरेबुवा विरुद्ध तुरेवाले शाहीर विलास गीजबीले सज्ज !!

दामोदर नाट्यगृहात कोकणातील जाखडी (शक्ती-तुरा) महा मुकाबल्याला शक्तिवाले शाहीर संदीप मोरेबुवा  विरुद्ध तुरेवाले शाहीर विलास गीजबीले सज्ज !!


मुंबई, (शांताराम गुडेकर) :
         कोकणातील माणसाच्या कणाकणात आणि मनामनात भरलेली  कला म्हणजे शक्तितुरा जो पुराण काळापासून आदी अनादी ही कला हे नृत्य पाहायला वाचायला मिळत आहे. संजय मांडवकर, प्रदीप गुरव, महेंद्र फटकरे आयोजित कोकणातील दोन युवा दिग्गज शाहिरांचा "शक्ती-तुरा" जंगी सामना शुभारंभाचा प्रथम प्रयोग" शक्तिवाले शाहीर संदीप मोरेबुवा विरुद्ध तुरेवाले शाहीर विलास गीजबीले यांचा जबरदस्त सामना रविवार  दिनांक २१ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी १०-३० वा. मुंबईतील प्रसिद्ध दामोदर नाट्यगृह परळ,मुंबई येथे होणार आहे. तरी कोकणभुमिपुत्रांनी या शक्ती-तुरा सामन्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहवे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

कालप्रवाह पुस्तकाचे प्रकाशन आणि निर्भीड जागल्या पुरस्काराचे वितरण !!

कालप्रवाह पुस्तकाचे प्रकाशन आणि निर्भीड जागल्या पुरस्काराचे वितरण !! मुंबई, पी. डी. पाटील (दि. २८/०४/२०२६) : मराठी वृत्तपत्र लेख...