जमाते इस्लामी हिंदतर्फे महिलांवरील वाढत्या अत्याचाराविरोधात जनजागृती हुंडा प्रथा..
"स्त्री भ्रूण हत्या, अश्लीलता या विषयांवर चर्चासत्र"
कल्याण, ऋषिकेश चौधरी :
कल्याण येथे जमात-ए-इस्लामी हिंदच्या वतीने समाजातील महिलांवरील वाढत्या अन्याय अत्याचाराविरोधात जनजागृती करण्याच्या उद्देशाने चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी उपस्थितांनी विविध विषयांवर आपले मनोगत व्यक्त केले.
या संघटनेने आयोजित केलेल्या या चर्चासत्रात जमाते इस्लामी हिंद, डॉ.इकराम कटावला, शाईस्ता खाटीक, ॲड. क्रांती रोटे, सागर वाघेला आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. संघटनेच्या लोकांनी सांगितले की, या झपाट्याने बदलत्या युगात महिला अजूनही वंचित आहेत. जुन्या चालीरीतींचे ओझे मात्र हुंड्यासाठी महिलांचा छळ करण्यासारखे अन्याय अत्याचार केले जात आहेत.
याशिवाय मोबाईल आणि इंटरनेटच्या माध्यमातून समाजात अश्लीलता वाढत आहे, सरकारने त्यांच्यावर बंदी घातली असली तरी आपण स्वतःही अश्लीलता टाळण्याची गरज आहे, यासोबतच स्त्री भ्रूणहत्या आणि अन्याय अत्याचाराविरुद्ध लढण्यासाठी महिलांनी कोणता मार्ग अवलंबला पाहिजे. या विषयावर चर्चा झाली.
या चर्चा सत्राच्या आयोजनात जमात इस्लामी हिंदच्या वेलफेअर युनिटचे अध्यक्ष अख्तरुल इमान, मोईन डॉन, अशफाक शेख, मिशाल चौधरी, नासिर खान, नईम काझी आदींचा सहभाग होता.




No comments:
Post a Comment