Wednesday, 3 November 2021

कल्याण ग्रामीण भागातील गोरगरीब, आदिवासींची दिवाळी गोड, संत आसाराम बापू आश्रमाचे कौतुकास्पद काम !!

कल्याण ग्रामीण भागातील गोरगरीब, आदिवासींची दिवाळी गोड, संत आसाराम बापू आश्रमाचे कौतुकास्पद काम !!


कल्याण, (संजय कांबळे) : दिवसेंदिवस वाढणारी महागाईने सर्वसामान्य यांचे कंबरडे मोडले आहे, तर मग गोरगरीब आदिवासी, कष्टकरी जनतेचे काय? आणि नेमका याच गोष्टींचा विचार करून संत आसाराम बापू आश्रम रायता मानिवली यांनी विविध दिपावली साहित्याचे वाटत नुकतेच कल्याण ग्रामीण भागातील अनेक गावात केले. त्यामुळे या गोरगरीबाँच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आंनद दिसून येत होता.


सध्या वाढत्या महागाई ने गोरगरीब, आदिवासी, कष्टकरी यांनी जगायचे कसे? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दिड दोन वर्षाच्या कोरोनाच्या संकटामुळे अनेकांचे रोजगार बुडाले आहेत, अशातच अतिवृष्टी, पुर, चक्रीवादळे यामुळे तर जीवनच उध्वस्त झाले आहे. हाताला काम नाही, तर दाम नाही, अशा कठीण अडचणी मुळे जगणे मुश्कील झाले आहे. आणि अशातच सतत वाढणारी महागाई, यामुळे तर दिवाळी सारखा सण कसा करायचा? या विवेचनात गोरगरीब असतानाच रायता मानिवली येथील संत आसाराम बापू आश्रम यांनी यांच्या जिवनात दरवर्षी प्रमाणे दिवाळी गोड केली.


डाळ, तांदूळ, साखर, तेल, साबण, उटणे, यासह ब्लाँकेट, कपडे, फटाके आणि चपल आदी उपयोगी साहित्य व गोड जेवण दिले. त्यामुळे ख-या अर्थाने यांची दिवाळी गोड झाली.


असे सर्व प्रकारचे उपयुक्त साहित्य, घोटसई, बापसई, रायते, मानिवली, वाघेरापाडा, वाहोली पाडा, आदी अनेक गावात वाटप करण्यात आले. यावेळी परहित चँरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष विशाल गुप्ता म्हणाले, संत आसाराम बापू यांनी गरीबांना दरीद्री नारायण म्हटले आहे, त्यामुळे यांची सेवा म्हणजे देवाची सेवा असे आम्ही मानतो, कोरोना काळात देखील संस्थेने, तसेच आश्रमने विविध प्रकारची मदत केली व करत आहेत. त्यामुळे इतरांनी देखील गोरगरीबांना मदत करावी असे अवाहन त्यांनी यावेळी केले.


याप्रसंगी आश्रमचे संचालक नरेंद्र भाई, रघू भाई, परहित संस्थेचे अध्यक्ष विशाल गुफ्ता, वाघेरापाडा येथील विठ्ठल शिद, आश्रम चे सर्व सेवाधारी, तसेच म्हारळ, वरप, कांबा, वाघेरापाडा येथील गोरगरीब, आदिवासी, कष्टकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !!

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !! ...