अनोख्या उपक्रमाने दीनदुबळ्यांसह गोरगरिबांची दिवाळी झाली गोड !!
**कल्याण येथील अनंत रिजेन्सी सोसायटी फेज १ तर्फ़े दहिवली वाडीत दिवाळीची अनोखी भेट**
मुरबाड, ( मंगल डोंगरे ) :
कल्याण रामबाग लेन नंबर ४ मधील अनंत रिजेन्सी सोसायटी फेज १ चा अनोखा उपक्रम राबवुन दिनदुबळ्यांसह गोरगरिबांना दिवाळी निमित्ताने गोडधोड पदार्थ देऊन त्यांची दिवाळी गोड केली.
दिवाळीत सगळीकडे धामधूम असताना गोरगरिबांना या सणाचा गोडवा चाखता यावा, यासाठी कल्याण मधील रामबाग लेन नंबर ४ मधील अनंत रिसेन्सि फेज १ या सोसायटी कडून आदिवासी वस्तीत अन्नधान्य,दिवाळी फराळ व कपड्यांचे वाटप करण्यात आले.
सोमवार १ नोव्हेंबर या दिवशी मुरबाड तालुक्यातील सोयी सुविधांपासून वंचित असलेली आदिवासी वस्ती असलेली दहिवली वाडी मध्ये दिवाळी सना निमित्ताने आदिवासी बांधवांसाठी प्रत्येक कुटुंबासाठी २५ किलो राशन (तेल, साखर, चहापावडर, तांदूळ, गहू, मसाले, कडधान्य, डाळ, बेसन, रवा, मैदा, साबण, ई.) वस्तूंच्या सोबत मुलांसाठी बिस्कीट बॉक्स,चॉकलेट, दिवाळी फराळ, महिला, मुले, तसेच तरुणांसाठी कपडे, साड्या आदी वस्तूंचे वाटप अनंत रिसेन्सि च्या पदाधिकारी व सदस्यांच्या तर्फे करण्यात आले.
सोसायटीच्या वतीने यंदाच्या वर्षी दीपावलीत 'झेप सोसायटीची' ह्या उपक्रमाला सुरुवात करून गोरगरिबांना दिवाळी भेट देऊन मोठ्या उत्साहात हा उपक्रम राबविण्यात आला.
दिवाळी म्हणजे दिव्यांचा झगमगाट, फराळाचा आस्वाद अन् फटाक्यांची आतिषबाजी हे नेहमी दिसणारे चित्र असले तरी, शहरी भागापासून दूर ग्रामीण भागातील आदिवासी वाड्यावस्तींवर, कसे तरी उभ्या असलेल्या कुडाच्या झोपडीतील आदिवासींचे चित्र म्हणजे अगदी त्याउलट. तिथे दिवाळी सण असो अथवा इतर कुठलाही सण म्हणजे एकप्रकारे अनेक कोस दूरचे अंतर. अशा या आदिवासी दिनदुबळ्यांच्या जीवनात एकप्रकारे दिपावलीची पणती पेटवण्याचे काम अनंत रिसेन्सि फेज १ च्या सभासदांनी एकत्र येऊन केले आहे.
सोसायटी तर्फ़े नागरिकांना सभासदांना आवाहन करून गरिबांसाठी फराळ कपडे यांची मदत मागितली. अनंत रिसेन्सि फेज १ च्या सभासदांनी या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. संकलन करण्यात आलेला फराळ आणि कपडे मुरबाड तालुक्यातील आदिवासी पाड्यावर वाटप करण्यात आले.
राज्यातील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांना आपल्या भारतीय सणांचे महत्त्व समजून घेऊन दिनदुबळे व गोरगरीब जनतेलाही आपले सन साजरे करता यावे यासाठी मदत करण्याचे आव्हाहन अनंत रिसेन्सि फेज १ चे सचिव पत्रकार हरेश हरड यांनी केलं आहे.
महेंद्र जोशी, हरेश हरड, यशवंत सरोदे, कृष्णा पाटील, मनोज मेहता, भगवान कोल्हे, अनिलकुमार खोल्लम, संतोष वाघमारे, सचिन सोनावणे आदींच्या उपस्थितीत सदरचा कार्यक्रम राबविण्यात आला असून या उपक्रमासाठी रात्रंदिवस मेहनत करणाऱ्या सोसायटीच्या सभासदांचे आभार अध्यक्ष महेंद्र जोशी यांनी मानले.



No comments:
Post a Comment