Sunday, 12 December 2021

कोकण कट्टा सन्मान पुरस्कार -२०२१ विलेपार्ले येथे उत्साहात संपन्न !! "कोकण कट्टाचे कार्य कौतुकास्पद- डॉ. गजानन रत्नपारखी"

कोकण कट्टा सन्मान पुरस्कार -२०२१ विलेपार्ले येथे उत्साहात संपन्न !!

"कोकण कट्टाचे कार्य कौतुकास्पद- डॉ. गजानन रत्नपारखी"
 

मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) :
                  सेवार्थ उपक्रमांची चळवळ असे ब्रीद वाक्य घेऊन मुंबईसह कोकण आणि अनेक जिल्ह्यात सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, पर्यावरण, कला, क्रीडा, सांस्कृतीक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या कोकण कट्टा या संस्थेतर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्था, मंडळ आणि व्यक्ती यांना "कोकण कट्टा सन्मान- २०२१" या पुरस्काराने  वीर सावरकर सेवा केंद्र, सनसिटी चित्रपट गृह समोर, विलेपार्ले पूर्व, मुंबई -५७ येथे डॉ. गजानन रत्नपारखी (हृदयरोग तज्ञ, अध्यक्ष : गुरुकृपा फाउंडेशन) यांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र, सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी ऍड. मनमोहन चोणकर,
संतोष ठाकूर (पनवेल), संस्थापक अजित पितळे, अध्यक्ष नितीन कुलकर्णी, सचिव योगेश साटम, कोषाध्यक्ष सुजित कदम यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थितीत होते. कोकण कट्टाच्या २२ व्या वर्धापनदिन निमित्ताने शनिवार दिनांक ११ डिसेंबर २०२१ रोजी १) सौ. स्नेहा सचिन पाटील- मोरे (पत्रकार- लोकमत) २) शैलेश जाधव (म. टा. छायाचित्रकार) ३) प्रमोद तरळ (मुक्त पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते) ४) हेमंत सावंत ( समाजसेवक आणि अध्यक्ष,स्वामी सेवा फाउंडेशन) ५) समीर खाडिलकर (सामाजिक कार्यकर्ते) ६) विजय बेटकर (अचानक मित्र मंडळ) ७) विकास सांबरे (सामाजिक कार्य- हनुमान कला, क्रीडा मंडळ) ८) गणेश देवरुखकर (प्रशिक्षक- मल्लखांब) ९) कृष्णा येद्रे (यु ट्यूब- आम्ही कोकणकर) १०) निखिल सकपाळ (यु ट्यूब - कोकणी निखिल) ११) अनिकेत रासम (यु ट्यूब - गोष्ट कोकणातली वाहिनी) १२) प्रगत लोके (यु ट्यूब - प्रगत लोके चॅनेल) १३) संजय जाधव (रुग्णसेवा) १४) विवेक वैद्य १५)आत्माराम डिके यांना गौरविण्यात आले. उपस्थिती सर्व मान्यवर यांनी कोकण कट्टाच्या २२ वर्षाचा कार्यकाळ चित्राफित च्या माध्यमातून बघितल्यानंतर सामाजिक काम कसे असावे यावर बोलताना पदाधिकारी, सदस्य आणि सभासद यांचे कौतुक केले. पुरस्कार विजेते यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की कोकण कट्टा यांचे काम बघून एक नवीन ऊर्जा मिळाली. आपणही या संस्थेचा आदर्श ठेऊन सामाजिक काम करू. शिवाय या कोकण कट्टा ला आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वसन दिले. प्रमुख पाहुणे डॉक्टर गजानन रत्नपारखी यांनी कोकण कट्टा च्या कामाचे कौतुक करत आपणही या सामाजिक कामात मदत करण्याचे आश्वासन दिले. खरोखरच कोकण कट्टा यांचे काम कौतुकास्पद आहे.उपरोक्त मान्यवर यांना हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल  त्यांना अनेकांकडून अभिनंदनासह शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमचे सूत्रसंचालन योगेश साटम यांनी केले. तर आभार प्रदर्शन संस्थापक अजित पितळे यांनी केले. शेवटी राष्ट्रगीताने पुरस्कार वितरण सोहळयाची सांगता करण्यात आली.

2 comments:

  1. खूप छान बातमी घेतली आहे

    ReplyDelete
  2. कोकण कट्ट्याच्या प्रदीर्घ 22 वर्षाच्या कार्यकाळाला सलाम. नोकरी व्यवसाय सांभाळून असं कोणतंही क्षेत्र नाहीं कि जिथे हि संगठना व स्वयंवसेवक पोहचले नाहीं. मग तो "देवभानचा" आदिवासी पाडा असो अथवा विलेपार्ले स्म्शान भूमिचे कार्यकर्ते असोत.
    तुमच्या 25 वर्ष पूर्ती च्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा. तो पर्यंत "करोना " सारखी महामारी समूळ नष्ट होऊन आमच्या सारखे जेष्ठ नागरिक
    व्ययकरित्या उपस्थित राहून तुम्हाला आशीर्वाद देतील. हिच तुमच्या कौतुकाची पावती असेल. 🌹

    ReplyDelete

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !!

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !! ** नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई उरण दि ५, (विठ्ठल ममताबादे) : उरण शहरातील वाह...