दलित जागा झाला नाही तर पेशवाई येईल .. , दलित अधिकार परिषदेत.. "जयसिंग वाघ" यांचा इशारा
चोपडा, बातमीदार .. आज मितीस दलितांचे अधिकार जे संविधानाच्या माध्यमातून मिळाले ते आता नाममात्र स्वरूपात शिल्लक राहिले आहेत, शिक्षणाचा, आरोग्याची सुरक्षा नौकरीचा अधिकार व शाश्वती जवळ जवळ संप ला आहे, अनेक भागांमध्ये तर दलितांना सुरक्षिततेचे जीणे, स्वाभिमनाने राहणे सुद्धा सुखकर राहिले नाही. दलितांचेच काय ओबीसी आदिवासी यांचे तरी संवेधनिक अधिकार कुठे शिल्लक राहिले? असा सवाल जळगाव येथील सत्यशोधक समाज अध्यक्ष श्री जयसिंग वाघ यांनी चोपडा येथे आयोजित दलित अधिकार जिल्हा परिषदेचे उद्घाटन करताना केला.
ते पुढे म्हणाले की, सवेधनिक अधिकार देशाच्या मालकीच्या ज्या संपत्तीवर जास्त प्रमाणात निर्भर असतात. त्याच मालमत्ता उदाहरणार्थ रेल्वे/ बी एस एन एल/ एफसि आय आदींची सर्यास विक्री चालू आहे. त्यामुळे केवळ दलितच नव्हे तर तमाम मागास व इतर मागास यांचेच अधिकार संकोचीत होत आहेत .आपण जर आपल्या हक्काबाबत आणि देशाची मालमत्ता विक्री व खाजगीकरण विरोधी एक झालो नाही तर पेशवाई कालीन दिवस आपल्याला मिळणे काही दूर नाही. असा इशारा त्यांनी आपल्या भाषणात दिला. तेंव्हा आपले अधिकार मिलवून घेण्यासाठी पुन्हा नव्या संघर्षाची गरज आहे असे ही प्रतिपादन त्यांनी केले.
दिनांक 18 व 19 डिसेंबर 2021 रोजी भारतीय शेतमजूर युनियन दलीत राइट्स फेडरेशन आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे औरंगाबाद येथे 18/19 डिसेंबर ला आयोजित राष्ट्रीय दलित अधिकार अधिवेशन घेण्यात येत, आहे त्यावर जनजागृती करण्यासाठी चोपडा येथे लाल बावटा शेतमजूर युनियन ने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात परिषद आयोजित केली होती.
परिषदेचे अध्यक्षस्थानी लासुरचे माजी सरपंच श्री. देवलाल बाविस्कर सर होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, दलित वर्ग आधीपासूनच अन्याय सहन करीत आला आहे व तो आजही सहन करीत आहे. दलित पीडित ओबीसी यांनी एकत्र यावे. असे आवाहन त्यांनी केले भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव लक्ष्मण शिंदे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत व परिषदेचे उद्देश समजावून सांगितला. परिषदेचे संयोजक शेतमजूर यूनियन चे राष्ट्रीय कमिटी मेंबर का अमृत महाजन यांनी परिषदेची सविस्तर माहिती मांडली, *जिल्ह्यातून औरंगाबाद अधिवेशन साठी दलित जनतेत काम करणारे सामाजिक कार्यकर्त्यांनी औरंगाबाद येथे अठरा डिसेंबर 2021 रोजी दलित अधिकार अधिवेशन रॅलीत सहभागी व्हावे* असे आवाहन केले. या परिषदेला किशोरजी कंडारे यावल, शंकर सोनू दरी रावेर, सुभाष पवार, महाराष्ट्र दिव्यांग फेडरेशनचे नेते व पत्रकार महेश शिरसाठ भाकप राज्य कौन्सिल सदस्य शांताराम पाटील. मंचावर होते.
शेवटी का गोरख वानखेडे यांनी आभार प्रदर्शन केले. परिषदेस स्त्री पुरुष मोठ्या संख्येने हजर होते. या परिषदे त दलित अधिकार संघर्ष मंच स्थापन करण्यात आला. त्यात अध्यक्ष गुरदास विजय मोरे उपाध्यक्ष शंकर सोनू दरी, सर्वश्री किशोर कनडारे, सुभाष पवार, दिनेश सोनवणे, निलेश अहिरे, सुमन रल, दत्तात्रय सोमवंशी आदींची निवड करण्यात आली या परिषदेला गरताड, अडावद, घाडवेल ,अकोलखेडा कृष्णपुर वढोदा, गोरगावले ,विरवाडा ,चाहरडी धनवाडी खरद, आदी गावातून अनेक शेतमजूर, आशा ग्रामपंचायत कर्मचारी, कार्यकर्ते उपस्थित होते. परिषदेला ,गोरख वानखेडे, मीनाक्षी सोनवणे, रत्नाबाई कोळी ,मनीषा पाटील, शोभा पाटील, सुरेश जाधव मल्हारी मांग, विद्या देवी बाविस्कर, श्री संजय बाविस्कर शेखर वानखेडे व विद्यार्थी ही हजर होते.



No comments:
Post a Comment